मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री मल्लिका शेरावत सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल खूप चर्चेत आहे. अलीकडेच, कास्टिंग काऊचबद्दल बोलताना ती म्हणाली की, तिच्या 'बोल्ड' ऑनस्क्रीन सीनमुळे, अनेक पुरुष कलाकार तिच्या जवळ येण्याचा प्रयत्न करायचे. पण तिने नेहमीच आपला मुद्दा स्पष्टपणे सर्वांसमोर ठेवला आणि कॉम्प्रोमाईज करण्यास नकार दिला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चित्रपटात बोल्ड सीन दिल्यानंतर बोल्ड इमेज बनवली गेली.
दिलेल्या एका मुलाखतीत तिने सांगितलं की, मी या सगळ्याचा थेट सामना केला नाही, माझं स्टारडम वाढतच गेलं. मी भाग्यवान होते की, हे सगळं माझ्यासाठी खूप सोपं होतं. मी मुंबईत आले आणि लगेजच मला ख्वाइश आणि मर्डरसारखे चित्रपट मिळाले. मला जास्त संघर्ष करावा लागला नाही. पण मर्डर चित्रपटांनंतर हा खूप बोल्ड चित्रपट असल्याने माझी प्रतिमा बोल्ड झाली होती. म्हणूनच अनेक पुरुष अभिनेत्यांनी माझं स्वातंत्र्य हिसकावण्याचा प्रयत्न केला आणि म्हणाले की, जर तुम्ही पडद्यावर बोल्ड होऊ शकता तर तुम्ही वैयक्तिकरित्या देखील असू शकता.


ती पुढे म्हणाली की, ''माझ्या ऑनस्क्रीन आणि ऑफस्क्रीन व्यक्तिमत्त्वामध्ये फरक समजून घेतला गेला नाही, म्हणून मी खूप कठीण परिस्थितींना सामोरे गेले, कारण मी खूप स्ट्राँग स्त्री आहे आणि मी पुरुष अभिनेत्यांना सांगितलं की, मी तडजोड करणार नाही, कारण मी बॉलिवूडमध्ये तडजोड करण्यासाठी आलेच नाही , मी इथे करिअर करण्यासाठी आले आहे. त्यानंतर त्या पुरुष अभिनेत्यांनी माझ्याबरोबर कधीच काम केलं नाही.


मी रात्री पार्टी किंवा ऑफिसमध्ये कोणाला भेटले नाही
दुसरीकडे, जेव्हा तिला विचारण्यात आलं की, तिने वाईट वाईब देणाऱ्या लोकांपासून 'दूर राहण्याचा' प्रयत्न केला आहे का? यावंर मल्लिका म्हणाली की, हे मी नेहमीच केलं आहे, कारण हे सगळं तेव्हा घडतं जेव्हा तुम्ही स्वतःला त्या स्थितीत ठेवता . मी बॉलिवूड पार्ट्यांमध्ये कधी गेलेच नाही. मी रात्री कधील हॉटेलमध्ये किंवा ऑफिसमध्ये कोणत्याही निर्माता किंवा दिग्दर्शकाला भेटले नाही मी स्वत:ला या सगळ्यापासून दूर ठेवलं.