मुंबई : अभिनेत्री मल्लिका शेरावत तिच्या बोल्ड इमेजमुळे चर्चेत असते. तिने अनेक चित्रपटांमध्ये बोल्ड सीन्स देऊन खळबळ माजवली आहे. मल्लिका शेरावतला तिच्या या इमेजमुळे अनेक विचित्र मागण्यांना सामोरं जावं लागलं. एका निर्मात्याने तर मल्लिकाला कंबरेवर चपात्या बनवायला सांगितलं होतं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

निर्मात्याकडून विचित्र मागणी 
मल्लिका शेरावतने एका मुलाखतीदरम्यान हा खुलासा केला आहे की, तिने सांगितलं की, एक निर्माता तिच्याकडे एक विचित्र कल्पना घेऊन आला होता. जो एका गाण्याच्या सीक्वेन्सबद्दल बोलत होता. मल्लिका म्हणाली, 'निर्मात्याने मला सांगितलं की, हे एक हॉट गाणं आहे. तुम्ही किती हॉट आहात हे प्रेक्षकांना कसं कळणार? तू इतकी हॉट आहेस की, मी तुझ्या कंबरेवर चपात्या भाजतो. मल्लिका म्हणाली कि, किती विचित्र. तुम्ही कधी असं काही ऐकलं आहे का?


मल्लिका शेरावत संतापली
निर्मात्याच्या या बोलण्याने मल्लिका शेरावत संतापली. ती म्हणाला, 'नाही, मी असं काही करत नाही, पण मला वाटतं की, हे किती फनी आणि ओरिजनल आहे. ही मूळ कल्पना आहे. ती म्हणाली की भारतात हॉटचा अर्थ काय समजला जातो हे मला समजत नाही. मला वाटतं भारतातील महिलांसाठी हॉटनेसबद्दल एक विचित्र धारणा आहे. मला ते समजू शकत नाही. अर्थात आता बरंय, पण जेव्हा मी माझ्या करिअरला सुरुवात केली तेव्हा ते खूप विचित्र होतं.