`मला वाटलं दरवाजा तोडेल,` रात्री 12 वाजता हिरोचा बेडरुममध्ये घुसण्याचा प्रयत्न; मल्लिका शेरावतचा धक्कादायक खुलासा
बॉलिवूड अभिनेत्री मल्लिका शेरावत तिच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखली जाते. नुकताच अभिनेत्रीने एक धक्कादायक खुलासा केला आहे.
Mallika Sherawat Shocking Revelation: बॉलिवूड अभिनेत्री मल्लिका शेरावत लवकरच 'विकी विद्या का वो वाला व्हिडिओ'मध्ये दिसणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत राजकुमार राव आणि तृप्ती डिमरी देखील मुख्य भूमिकेत असणार आहेत. काही दिवसांपूर्वीच मल्लिका शेरावत हिने तिच्यासोबत घडलेल्या एका धक्कादायक घटनेचा खुलासा केला आहे. तिने सांगितले आहे की, मध्यरात्री तिच्या चित्रपटाच्या अभिनेत्याने तिच्या बेडरुमचा दरवाजा जोरात वाजवला होता. मात्र, मल्लिका शेरावतने त्या अभिनेत्याचे नाव सांगितले नाही.
सध्या अभिनेत्री मल्लिका शेरावतचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. अभिनेत्री दुबईमध्ये एका मोठ्या अभिनेत्यासोबत एका चित्रपटाच्या शूटसाठी गेली होती. व्हिडीओमध्ये मल्लिका म्हणतेय की, मी तुम्हाला एक उदाहरण सांगत आहे. मी दुबईमध्ये एका मोठ्या चित्रपटाचे शूटिंग करत होते. तो एक मल्टीस्टारर चित्रपट होता. त्याचबरोबर तो एक सुपरहिट चित्रपट होता. ज्यामध्ये मी विनोदी भूमिका साकारली आहे.
मल्लिका शेरावतसोबत नेमकं काय घडलं?
मल्लिका शेरावत पुढे म्हणाली की, त्या चित्रपटाचा अभिनेता रात्री 12 वाजता माझ्या बेडरुमचा दरवाजा वाजवत होता. तो दरवाजा इतक्या मोठ्याने वाजवत होता की, मला वाटायचे की हा दरवाजा तोडणार आहे. कारण त्याला माझ्या बेडरुममध्ये यायचे होते. मी म्हणाले नाही. असे होणार नाही. त्यानंतर त्या अभिनेत्याने माझ्यासोबत कधीही काम केलं नाही. मात्र, मल्लिका शेरावतने कोणाचेही नाव घेतले नाही.
मल्लिका शेरावत लवकरच तिच्या आगामी चित्रपट 'विकी विद्या का वो वाला व्हिडीओ' मध्ये दिसणार आहे. दोन वर्षांनंतरचा तिचा हा पहिला हिंदी चित्रपट आहे. याआधी देखील तिने रजत कपूर दिग्दर्शित 'RK/RKAY' चित्रपटात दिसली होती.
'विकी विद्या का वो वाला व्हिडीओ' या दिवशी रिलीज होणार
'विकी विद्या का वो वाला व्हिडीओ' हा चित्रपट रिलीजसाठी सज्ज झाला आहे. ट्रेलर पाहिल्यानंतर लोक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. 11 ऑक्टोबर 2024 रोजी हा चित्रपट थिएटरमध्ये दाखल होणार आहे. या चित्रपटात राजकुमार राव, तृप्ती डिमरी आणि मल्लिका शेरावत दिसणार आहे. चाहत्यांना देखील या चित्रपटाची प्रचंड उत्सुकता लागली आहे.