मुंबई : सिनेमांमध्ये एकापेक्षा एक बोल्ड सीन देणारी अभिनेत्री मल्लिका शेरावत सध्या गोव्यात आहे. तिथून अभिनेत्री सतत तिचे फोटो शेअर करत असते. अलीकडेच, अभिनेत्रीने रस्त्याच्या मधोमध उभं राहून काही फोटो क्लीक केले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मल्लिका सध्या मोठ्या पडद्यापासून दूर आहे. पण तिच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे ती सतत चर्चेत असते. ती चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी नवनवीन लूक करताना दिसते. आणि फोटो पोस्ट करत सगळ्यांचं लक्षवेधून घेते. 


या समोर आलेल्या फोटोंमध्ये मल्लिका शेरावतने ऑफ शोल्डर ब्लू प्रिंटेड ड्रेस परिधान केला आहे. तिचा लूक पूर्ण करण्यासाठी मल्लिकाने तिचे केस बांधले आहेत आणि हलका मेकअप केला आहे. या संपूर्ण लूकमध्ये अभिनेत्री खूपच हॉट दिसत आहे.


पण तिचा ड्रेस पाहून अनेकजण हा ऑफ शोल्डर ड्रेस आहे की फक्त स्कार्प असा प्रश्न देखील विचारत आहेत. हा फोटो मल्लिका शेरावतने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे.



फोटो शेअर करताना अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये लिहिले- 'झाडांच्या सानिध्यात घालवलेला वेळ कधीही वाया जात नाही, निसर्ग खूप शांतता आणि आनंद देणारं आहे.'