Mallika Sherawat Birthday: बॉलिवूडमध्ये आत्तापर्यंत अनेक बोल्ड अभिनेत्री पाहिल्या आहेत. आज सिनेसृष्टीतील बोल्ड आणि ब्यूटिफुल अभिनेत्री मल्लिका शेरावतचा वाढदिवस आहे. आज मल्लिका 48 वर्षांची झाली मात्र आजही तिचे सौंदर्य काही कमी झालेलं नाही. मल्लिकाने तिच्या करिअरची सुरुवात टीव्ही जाहीरातींपासून सुरू केली. त्यानंतर तिने सिनेमात काम करण्यास सुरुवात केली. मात्र, इतक्या वर्षांच्या करिअरमध्ये मल्लिकाला फक्त दोन हिट चित्रपट मिळाले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मल्लिका शेरावत आज 48 वर्षांची आहे. मल्लिका जरी चित्रपटांपासून लांब असली तरी सोशल मीडियावर ती सक्रिय आहे. हरियाणातील हिसारमधील एका छोट्याशा गावातून आलेल्या मल्लिकाने हॉलिवूडपर्यंतचा पल्ला गाठला आहे. मल्लिका शेरावतच्या वडिलांना तिला आयएएस करायचं होतं. मात्र, तिला अभिनयातच करिअर करायचे होते. त्यामुळं तिला वडिलांच्या विरोधात जावे लागले. त्यानंतर तिने कुटुंबासोबतचे संबंध तोडले. सिनेसृष्टीत करिअर करण्यासाठी मल्लिकाने तिचं नावही बदललं होतं. मल्लिकाचे खरे नाव रिमा लांबा असं आहे. 


मल्लिका शेरावत चित्रपटात येण्यापूर्वी एअरहोस्टेस म्हणून काम करत होती. तिने तिच्या करिअरची सुरुवात 2002मध्ये आलेल्या जीना सिर्फ मेरे लिए या चित्रपटातून केली. या चित्रपटातून तिने कॅमिओ केला होता. तर मुख्य भूमिका म्हणून ख्वाहिश या चित्रपटातून तिने सिनेसृष्टीत पाऊल ठेवले. 2004मध्ये आलेल्या मर्डर चित्रपटातून तिला ओळख मिळाली. मर्डर चित्रपटानंतर मल्लिकाने तिच्या फीमध्ये वाढ केली होती. त्याव्यतिरिक्त वेलकम, प्यार के साइड इफेक्टस, डबल धमाका, हिस्स सारख्या चित्रपटात काम केले आहे. मल्लिकाने पहिल्याच सिनेमात 21 किसिंग सीन दिले होते. 


मल्लिका शेरावतने बॉलिवूड ते हॉलिवूडपर्यंतच्या चित्रपटांत काम केले आहे. यात द मिथ, पॉलिटिक्स ऑफ लव्ह सारख्या चित्रपटांचा समावेश आहे. त्या व्यतिरिक्त मल्लिका एका चिनी चित्रपटात टाइम रेडर्समध्येदेखील तिने काम केले होते. 


मल्लिकाच्या खासगी आयुष्याबद्दल बोलायचे झाल्यास मल्लिकाने जेव्हा बॉलिवूडमध्ये पदार्पण केले तेव्हा तिचे लग्न झाले होते. मात्र, तिने सर्वांपासून ही गोष्ट लपवून ठेवली होती. मल्लिकाचे लग्न जेट एअरवेजचा पायलट कॅप्टन करण सिंह गिलसोबत लग्न केले होते. 2004मध्ये अभिनेत्रीने सिनेसृष्टीत पदार्पण केले होते तर तिच्या लग्नाची गोष्ट 2009मध्ये समोर आली होती. मात्र, काहीच वर्षात तिचा घटस्फोटदेखील झाला होता.