मुंबई  : महानायक अमिताभ बच्चन कोरानाच्या साथीच्या काळात लोकांना सतर्क राहण्याचं आवाहन करीत आहेत. अमिताभ बच्चन यांनी सोशल मीडियावर देखील अनेक पोस्ट केलेल्या आहेत. यासोबत त्यांच्या आवाजाची कॉलर ट्यून देखील ऐकू येत आहे. आता दिल्ली हायकोर्टात एकाने याचिका दाखल केली आहे की, अमिताभ बच्चन यांची मोबाईल कॉलर ट्यूनची कोरोनावर सतर्क राहण्याचा सल्ला देते, ती काढून टाकण्यात यावी.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आज तकने दिलेल्या बातमीनुसार, राकेश नावाच्या याचिकाकर्त्याने जनहित याचिका दिल्ली हायकोर्टात दाखल केली आहे. यात म्हणण्यात आलं आहे की, अमिताभ बच्चन आवाज देण्याच्या बदल्यात भारत सरकारकडून पैसे घेत आहेत. पण देशात असे देखील सच्चे कोरोना वॉरियर्स आहेत, त्यांनी कोरोना काळात मोठ्या मदतीचं काम केलं, याचिकेत अमिताभ बच्चन मागणी करण्यात आली आहे की, अमिताभ बच्चन यांच्या ऐवजी कोरोना वॉरियरचा आवाज वापरला पाहिजे.


अमिताभ बच्चन यांना देखील यापूर्वी कोरोना झालेला आहे. तसेच त्यांचा मुलगा अभिषेक बच्चन, सून ऐश्वर्या बच्चन आणि नात आराध्या हिला देखील कोरोना झाला होता. अमिताभ बच्चन यांचा कोरोनाविषयी इशारा आणि सूचना देणारा संदेश हा मोबाईलवरुन कॉल जाताना सुरुवातीला येतो.


तसेच या दरम्यान एका महिलेच्या आवाजात देखील असा संदेश येतो. या महिलेची कॉलर ट्यून काही दिवसापूर्वी बंद झाली होती. तेव्हा संबंधित महिला कोरोना पॉझिटिव्ह असल्याने, ती आता कामावर नाही, म्हणून तिचा आवाज येत नसल्याचा जोक देखील व्हायरल झाला होता.