Aryan Khan NCB Arrest : NCB ऑफिसमध्ये आर्यनसोबत सेल्फी घेणारी `ती` व्यक्ती कोण?
NCB कडून अधिकृत माहिती
मुंबई : शाहरूख खान (Shahrukh Khan) चा मुलगा आर्यन खान (Aryan Khan) च्या ड्रग्स प्रकरणाची चर्चा सोशल मीडियावर चांगलीच रंगली आहे. या सगळ्या प्रकरणात आर्यन खानचे वेगवेगळे फोटो चर्चेत आहेत. त्यातील एक फोटो असा आहे की, ज्यामध्ये आर्यन खानसोबत एका व्यक्तीने सेल्फी घेतला आहे. ही व्यक्ती नेमकी कोण आहे? सेल्फी घेणाऱ्या व्यक्तीचा आणि NCB चा काही संबंध आहे का?
एनसीबीच्या अधिकाऱ्यांच्या अधिकृत माहिती
क्रूरवर छापा टाकल्यानंतर आर्यनला एनसीबीने ताब्यात घेतलं. या दरम्यान एक फोटो समोर आला. या फोटोवर चर्चा झाली की, सेल्फी घेणारी ही व्यक्ती कोण आहे? व्हायरल झालेल्या या फोटोत नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरो (NCB) चा अधिकारी असल्याचं म्हटलं जात आहे. आता मात्र एनसीबीने याबाबत अधिकृत माहिती दिली आहे.
बॉलिवूडचा किंग खान शाहरुखचा मुलगा आर्यन खान याला रविवारी NCB अर्थात नार्कोटीक्स कंट्रोल ब्युरोकडून अटक करण्यात आली. अंमली पदार्थांचं सेवन, विक्री आणि ते पदार्थ जवळ बाळगल्याप्रकरणी त्याला ताब्यात घेण्यात आलं. आपल्याला अटक करण्यात आलेल्या परिस्थितीची जाण असल्याचं म्हणत त्यानं सदर प्रकरणाची माहिती त्याच्या कुटुंबाला दिली.
शनिवारी मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या एका जहाजात एनसीबीच्या अधिकाऱ्यानी कारवाई करत अंमली पदार्थ जप्त केले होते.या प्रकरणात एकूण 8 जणांना ताब्यात घेण्यात आले होते. तर 3 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलं. आर्यन खानला अटक केल्यानंतर त्याची कसून चौकशी केली जात आहे. या चौकशीत अनेकांची नाव समोर आली आहेत. दरम्यान चौकशी सुरु असताना आर्यन ढसा-ढसा रडल्याचं बोललं जातंय. त्याने आपल्या वडिलांना म्हणजेच शाहरुख खानला कॉल केल्याचं कळतंय.
2 मिनिट या दोघांमध्ये संभाषण झालं. वकिलांमार्फत शाहरुख आणि आर्यन एकमेकांसोबत बोलू शकले. आर्यन खानच्या अडचणीत वाढ झाल्याचं ही बोललं जात आहे. त्यामुळे आता शाहरुख यावर काय प्रतिक्रिया देतोय याकडे सगळ्याचं लक्ष लागलं आहे.