आज मोदींसोबतचा `Man vs Wild` शो या चॅनेलवर पाहता येणार
पंतप्रधान मोदींसोबतचा स्पेशल शो...
नवी दिल्ली : नरेंद्र मोदी भारताचे पहिले असे पंतप्रधान आणि नेते आहेत ज्यांनी पहिल्यांदा बेअर ग्रिल्सचा प्रसिद्ध शो मॅन वर्सेस वाइल्ड मध्ये भाग घेतला. डिस्कवरीचा हा शो १२ ऑगस्टला प्रदर्शित झाला. जगभरातील १८० देशांमध्ये विविध ८ भाषांमध्ये हा शो प्रदर्शित करण्यात आला. जंगलात कठीण प्रसंगात कशा प्रकारे स्वत:ला वाचवलं पाहिजे. याबाबत या शोमध्ये दाखवलं जातं. मोदींचा या शोमध्ये सहभाग असल्याने अनेकांनी हा शो आवर्जून पाहिला.
हा शो फक्त डिस्कवरीवर दाखवण्यात आल्याने भारतातील अनेक लोकांना हा शो पाहता आला नाही. उत्तराखंडच्या जंगलात मोदींचा हा प्रवास कसा होता. हे आता अशा लोकांना पाहता येणार आहे. आज १३ ऑगस्टला हा शो डीडी नॅशनलवर पाहता येणार आहे. केंद्रीय सूचना आणि प्रसारण मंत्रालयाने याची खास व्य़वस्था केली आहे.
केंद्रीय सूचना आणि प्रसाणर मंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटलं की, ज्यांना डिस्कवरीवर हा शो पाहता आला नाही. त्यांना १३ ऑगस्टला हा शो रात्री ९ वाजता डीडी नॅशनलवर पाहता येणार आहे.'
दूरदर्शनच्या माहितीनुसार, मॅन वर्सेस वाइल्डचा मोदी स्पेशल शो ट्विटरवर टॉप ट्रेंडिंगमध्ये होता. भारतात ट्विटरवर #modiondiscovery दुसऱ्या क्रमांकावर तर जगभरात विसव्या स्थानावर ट्रेंड होत आहे.
बेयर ग्रिल्ससोबत मोदींचा हा शो खास ठरला. जिम कार्बेटमधील जगंल सफारीमध्ये मनुष्यासाठी जंगल आणि निसर्गाचं अस्थित्व किती महत्वाचं आहे. हे कळतं. या दरम्यान मोदींनी निसर्ग, डोंगर, एडवेंचर बाबतचा त्यांचा अनुभव देखील शेअर केला.