मुंबई : अभिनेत्री कतरिना कैफ आणि तिचा पती, अभिनेता विकी कौशल या दोघांनाही जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आणि या प्रकरणाची तक्रार थेट पोलिसांपर्यंत पोहोचली. पोलिसांपर्यंत हे प्रकरण पोहोचताच अखेर त्यासंदर्भातील तपास तातडीनं हाती घेण्यात आला. बऱ्याच प्रयत्नांनंतर अखेर कतरिनाला धमकी देणाऱ्या इसमाला पोलिसांनी ताब्यात घेतलं. (man who threatened Bollywood Actress katrina kaif got arrrested)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोशल मीडियावरून धमकी देणारा हा एक अगदीच नवखा आणि अभिनय क्षेत्रात ओळख निर्माण करु पाहणारा कलाकार असून, तो कतरिनाचा चाहताही असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. मनविंदर सिंग असं त्याचं नाव. 


कतरिनाशी लग्न करण्याचा मनसुबा असल्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून तो सातत्यानं तिला सोशल मीडियाच्या माध्यमातून त्रास देत होता. ही गोष्ट टोकाला तेव्हा पोहोचली जेव्हा त्यानं अभिनेत्रीला जीवे मारण्याची धमकी दिली. सोमवारी सकाळी पोलिसांनी कारवाई करत या इसमाला ताब्यात घेतलं.