घटस्फोटाच्या चर्चांमध्ये हे काय बोलून गेला Manasi Naik चा पती, एकदा पाहाच
Manasi Naik च्या पतीनं घटस्फोटांच्या चर्चां दरम्यान शेअर केलेली ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे.
Manasi Naik and Pradeep Kharera Divorce : मराठी अभिनेत्री मानसी नाईक (Mansi Naik) ही तिच्या उत्तम नृत्यशैलीसाठी ओळखली जाते. मानसीचं ‘बघतोय रिक्षावाला’ (Baghtoy Rikshawala), ‘बाई वाड्यावर’ ही गाणी चांगलीच लोकप्रिय झाली होती. खरंतर या गाण्यांमुळे मानसीला घराघरात ओळख मिळाली. काही दिवसांपूर्वी मानसी आणि तिचा पती प्रदीप खरेरा (Pradeep Kharera) यांच्या घटस्फोटाच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. दरम्यान, तिच्या घटस्फोटाच्या चर्चा सुरु असताना तिचा पती प्रदीप खरेरानं नुकतीच सोशल मीडियावर शेअर केली आहे. या पोस्टपेक्षा प्रदीपनं या पोस्टला दिलेल्या कॅप्शननं सगळ्यांचे लक्ष वेधले आहे.
प्रदीपनं त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. नेहमी फिटनेसचे व्हिडीओ शेअर करणाऱ्या प्रदीपनं असाच एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत 'मी प्रत्येक गोष्टींवर प्रतिक्रिया देत नाही, पण माझ्यावर विश्वास ठेवा मी सर्व गोष्टींवर नीट नजर ठेवून असतो,' असे कॅप्शन त्यानं दिलं आहे.
कोण आहे मानसी नाईकचा पती प्रदीप खरेरा?
मानसीसा पती प्रदीप खरेरा हा एक बॉक्सर आणि मॉडेल (Mansi Naik Husband Profession)आहे. बरीच वर्षे डेट केल्यानंतर त्यांनी सप्तपदी घेण्याचा निर्णय घेतला होता. नेहमीच पतीसोबत फोटो शेअर करणारी मानसी गेल्या काही दिवसांपासून प्रदीपसोबतचे फोटो शेअर करत नसल्याचे काही नेटकऱ्यांच्या लक्षात आले आहे. फक्त मानसी नाही तर तिचा पती प्रदीप देखील नेहमीच मानसीसोबत फोटो शेअर करायचा. (Mansi Naik Husband Is Boxer and Model)आता त्याच्या अकाऊंटवरही मानसीचे फोटो दिसत नाही असे म्हणत काही नेटकऱ्यांनी ती विभक्त झाले का किंवा त्यांच्यात दुरावा आला का असा प्रश्न केला आहे. दरम्यान, त्या दोघांनी या बातमीला दुजोरा दिलेला नाही. मानसी आणि प्रदीप 19 जानेवारी 2021 रोजी लग्नबंधनात अडकले होते.