Akshay Kumar चा Bell Bottom पाकिस्तानच्या विरोधात? Pakistani चाहत्याच्या आरोपावर अक्षय कुमारनं दिलं सडेतोड उत्तर म्हणाला...

Akshay Kumar नं नुकतीच सौदी रेड इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये हजेरी लावली होती. त्यावेळी चाहत्यानं विचारलेल्या प्रश्नावर उत्तर दिलं आहे. 

Updated: Dec 5, 2022, 12:21 PM IST
Akshay Kumar चा Bell Bottom पाकिस्तानच्या विरोधात? Pakistani चाहत्याच्या आरोपावर अक्षय कुमारनं दिलं सडेतोड उत्तर म्हणाला... title=

Akshay Kumar's Movie Are Against Pakistan : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) हा लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. अक्षय हा त्याच्या चित्रपटांमुळे नेहमीच चर्चेत असतो. त्याचे बरेच चित्रपट हे देशभक्तीवर आधारीत असतात. अक्षय अलीकडेच सौदी रेड इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी झाला होता. त्यावेळी त्याच्या एका चाहत्यानं दावा केला आहे की, त्याचा 'बेल बॉटम' (Bell Bottom) हा चित्रपट पाकिस्तानच्या विरोधात बनवण्यात आला आहे. आता यावर अक्षयनं त्याची प्रतिक्रिया दिली आहे. 

अक्षय अलीकडेच सौदी रेड इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी झाला, त्यावेळी तिथे उपस्थित असलेल्या एका व्यक्तीनं अक्षयला त्याच्या 'बेल बॉटम' या चित्रपटाबाबत एक धक्कादायक प्रश्न विचारत म्हणाला, 'मी तुमच्या शेजाचा देश पाकिस्तानचा आहे. तुम्ही 'पॅड मॅन' (Pad Man) आणि 'टॉयलेट' (Toilet: Ek Prem Katha) सारखे उत्तम चित्रपट बनवले आहेत. भारत आणि पाकिस्तानमध्ये अनेक वाद सुरु आहेत. पण तुमच्या अलीकडेच प्रदर्शित झालेल्या बेल बॉटम चित्रपटात अनेक गोष्टी पाकिस्तानच्या विरोधात दाखवण्यात आल्या होत्या.' (Akshay Kumar's Pakistani Fan)

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

पाहा काय म्हणाला अक्षय 

त्या पाकिस्तानी चाहत्याच्या चाहत्यावर उत्तर देत अक्षय म्हणाला, 'सर, हा फक्त एक चित्रपट आहे. त्याबद्दल इतका गंभीर विचार करु नका. हा फक्त चित्रपट आहे.' अक्षयच्या बेल बॉटम या चित्रपटाचे दिग्दर्शन रणजीत तिवारी यांनी केले होते. चित्रपटाची कथा इंडियन एअरलाइन्सच्या विमान अपहरणाभोवती फिरते, प्रवाशांची सुटका करणे ही या चित्रपटाची पटकथा आहे. (pakistani man claims akshay kumar s bell bottom is against pakistan actor reacts) 

हेही वाचा : IndiGo च्या वाईट अनुभवावर Rana Daggubati ची संतप्त प्रतिक्रिया म्हणाला...

दरम्यान, अक्षयच्या अपकमिंक प्रोजेक्ट्स बद्दल बोलायचं झालं तर तो आता सेक्स एज्युकेशनवर (Sex Education) चित्रपट बनवत आहे. सौदी रेड इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये अक्षयनं हा खुलासा केला आहे. या चित्रपटाविषयी सांगताना अक्षय म्हणाला की हा खूप महत्त्वाचा विषय आहे.