Manasi Naik : मराठमोळी अभिनेत्री मानसी नाईक ही तिच्या डान्ससाठी ओळखली जाते. मानसी नाईकला ‘बाई वाड्यावर’ आणि ‘बघतोय रिक्षावाला’ या गाण्यामुळे लोकप्रियता मिळाली असं म्हणायला हरकत नाही. गेल्या काही दिवसांपासून घटस्फोटामुळे चर्चेत असलेली मानसी सतत सोशल मीडियावर काही पोस्ट शेअर करताना दिसते. या पोस्टमध्ये मानसी जे काही बोलते त्यावरून ती नेहमीच तिच्या घटस्फोटावर बोलते असे नेटकऱ्यांचं म्हणणे आहे. आता मानसीनं आणखी एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. या पोस्टमध्ये मानसी जे काही म्हणाली त्यावरून तिच्या आयुष्यात प्रेम आलं का असा सवाल अनेकांना पडला आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मानसीनं हा व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडीओत मानसी बोलते की मला विश्वास आहे की 'देवानं सगळ्यांसाठी एक साथीदार आधीच निवडला आहे. फक्त त्या लोकांना भेटणं हे आपल्यावर सोडलं आहे. त्यानं आपल्याला जोड्यांमध्येच बनवलं आहे आणि प्रत्येकासाठी एक साथी आहे.' तर हा व्हिडीओ शेअर करत मानसीनं कॅप्शन दिलं की "लक्षात ठेवा, तुम्ही एका बक्षीसाप्रमाणे आहात… आणि नेहमीच रहाल! तुम्ही अशा व्यक्तीबरोबर असण्यास पात्र आहात जो तुमच्याकडे दररोज लॉटरी जिंकल्याप्रमाणे पाहतो. संपूर्ण जग त्याच्यासमोर असते तरीही… त्यामुळे कधीही प्रेमाची आशा सोडू नका. प्रेम वाईट नसतं. काही लोक फक्त त्याचा गैरवापर करतात, अपमान करतात, त्याला गृहीत धरतात. तुमचा प्रेमावरील विश्वास कमी होईल असं कोणालाही वागायला देऊ नका. कधीकधी तुम्ही निवडलेल्या व्यक्तीच्या हृदयाचे ठोके तुम्हाला हृदयविकाराचा झटका देऊ शकतात. त्याऐवजी त्या गोष्टी निसर्गावर सोडा, सकारात्मक व्हा. प्रेमाला तुम्हाला शोधू द्या." मानसीची ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. तिच्या पोस्टनं सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


हेही वाचा : जगप्रसिद्ध Times Square वर पत्नीने असं काही केलं की Kushal Badrike म्हणाला, "याला म्हणतात यश"


दरम्यान, मानसी नाईकच्या खासगी आयुष्याविषयी बोलायचे झाले तर ती आणि प्रदिप खरेरा बराच काळ रिलेशनशिपमध्ये होते. त्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर 19 जानेवारी 2021 रोजी लग्नबंधनात अडकले. ते दोघे सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत एकमेकांवर असलेले प्रेम व्यक्त करायचे. त्या दोघांची जोडी ही चाहत्यांना खूप पसंत देखील आली होती पण लग्नाच्या काही दिवसांनंतर त्यांच्यात वाद होऊ लागले आणि मग त्यांच्यात दुरावा येऊ लागला. त्यानंतर आता मानसी पुढे तिच्या आयुष्यात कोणाला येण्याची संधी देईल का असा सवाल तिच्या चाहत्यांना आहे.