मुंबई : मराठी कलाविश्वात आपल्या नृत्य शैलीमुळे चाहत्यांना वेड लावणारी अभिनेत्री मानसी नाईक तीन दिवसांपूर्वी विवाहबंधनात अडकली. प्रदीप खरेरासोबत मानसीने साताजन्माची गाठ बांधली आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून मानसी आणि प्रदीप यांच्या लग्नाची चर्चा सुरु होती. अखेर मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत त्यांचा लग्नसोहळा पार पडला आहे.



मानसीने तिच्या लग्न सोहळ्याचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तिचे हे नवरीच्या रूपातील फोटो अत्यंत सुंदर आहे. विवाहानंतर रंगतो तो पाठवणीचा कार्यक्रम. याच कार्यक्रमादरम्यानचे काही भावूक फोटो मानसीने शेअर केले आहेत. 



व्हिडिओमध्ये मानसीचे डोळे आईला मिठी मारता क्षणी भारून आले. शिवाय तिने आईसाठी कॅप्शन देखील दिलं आहे. ‘बाई वाड्यावर या’ फेम मानसीचा विवाह झाल्यामुळे तिची आई देखील भावूक झाली. एकीकडे मुलीच्या लग्नाचा आनंद तर दुसरीकडे तिच्या जाण्यामुळे दु:ख अशा दोन्ही गोष्टींमुळे तिची आई अत्यंत भावूक झाल्याचं या व्हिडिओमध्ये दिसत आहे.