मुंबई : कंगना रानौतच्या लॉकअप या शोने बरीच चर्चा निर्माण केली होती. कंगना राणौतचा या शोमधील स्पर्धकांची सोशल मीडियावर बरीच चर्चाही होती.  या शोमध्ये दररोज धक्कादायक खुलासे होत होते. अशातच  सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. काही दिवसांपूर्वी पूनम पांडेने तिचा माजी पती सॅम बॉम्बेबद्दल असा खुलासा केला आहे. ज्याने सर्वांनाच हादरवून सोडलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पूनम पांडेला किती वेदना झाल्या आहेत. या बद्दल तिने या शोमध्ये खुलेपणाने सांगितलं आहे की, आता या एपिसोडमध्ये मंदाना करीमीने तिच्या माजी पतीची अशी अनेक गुपिते उघड केली आहेत, जी याआधी जगाला माहीत नसतील. चला तर मग जाणून घेऊया काय आहे हे संपूर्ण प्रकरण.


इराणी मॉडेल आणि अभिनेत्री मंदाना करीमीने आझम फलाहशी बोलताना लग्नानंतरची अनेक गुपितं उघड केली आहेत. आधी माजी पती कसा होता ते सांगितलं आणि पुढे सासू कशी होती हे देखील सांगितलं. आपल्या माजी पतीबद्दल बोलताना मंदाना करीमी म्हणाली, 'माझं वयाच्या 27 व्या वर्षी लग्न झालं. आम्ही अडीच वर्षे एकमेकांना डेट केलं आणि मग लग्न  .


आम्ही बरेच दिवस वेगळे राहत होतो. घटस्फोट नुकताच २०२१ मध्ये झाला आहे. आम्ही वेगळे होतो आणि या चार वर्षांत माझ्या ओळखीच्या सर्व लोकांसोबत त्याने ते केलं जे जाणून मलाही धक्का बसला. हे ऐकल्यानंतर अजय फलाहलाही धक्का बसला.


अजमा फलहशी बोलताना मंदाना करीमीने तिच्या सासूबाईंबद्दल पुढे सांगितलं की, ती मला एकटीला कुठेही जाऊ देत नव्हती. आणि मी एकटी गेलेच तर लोकांना फोन करून विचारायची की, मी खरंच त्यांच्यासोबत आहे की नाही. एवढंच नाही तर लग्नानंतर त्यांनी मला घरातच कैद केलं. या सर्व गोष्टी जाणून घेतल्यानंतर सर्व प्रेक्षकांपासून लॉकअपच्या स्पर्धकांपर्यंत सर्वच जण लगेच हादरलं.