मुंबई : अभिनेत्री, मॉडेल आणि फॅशन डिझाइनर मंदिरा बेदी 48 वर्षांची झाली आहे. तिचा जन्म 15 एप्रिल 1972 मध्ये कोलकात्तामध्ये झाला मंदिराच्या वडिलांचं नाव वीरेंद्र सिंह बेदी आणि आईचं नाव गीता बेदी आहे मंदिरा खासकरुन 90च्या दशकमधील 'शांति'च्या लीड रोलमुळे घराघरात पोहचली


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या शोमध्ये मंदिराने 'शांति'ची भूमिका निभावली होती, जी अपल्या हक्कासाठी लढाई लढत असते या शोनंतर मंदिरा बेदीला घरा-घरांत शांति या नावाने प्रेक्षक ओळखू लागले. यानंतर मंदिराने 'औरत' आणि 'क्योंकि सास भी कभी बहू थी' सीरियल्स मध्ये काम केलं


'शांती'मधील ग्लॅमरपासून दूर मंदिरा बेदी आज तिच्या स्टाईल आणि ग्लॅमरस स्टाईलसाठी प्रसिद्धसाठी आहे. अँकर म्हणून तिने आयपीएल सीझन -3 चं कव्हरेज केलं होतं. यावेळी तिने नेसलेल्या साड्या बर्‍याच प्रमाणात लोकप्रिय झाल्या. २०२४मध्ये तिने स्वत:चं साडी स्टोअरदेखील लाँच केलं. नुकताच मंदिराने एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये मंदिरा तिच्या मैत्रिणींसोबत डान्स करताना दिसत आहे. तिचा  हा व्हिडिओ बर्थडे पार्टीमधला आहे


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

A post shared by Mandira Bedi (@mandirabedi)


'व्हॅलेंटाईन डे'ला मंदिरा अडकली लग्नबंधनात
मंदिराने प्रेमाच्या दिवशी म्हणजेच 'व्हॅलेंटाईन डे'ला लग्न केलं. 14 फेब्रुवारी 1999ला तिने चित्रपट निर्माता राज कौशल यांच्याबरोबर लग्नगाठ बांधली. या दोघांना एक मुलगा आहे, ज्याचा जन्म 19 जून 2011ला झाला. लग्नाच्या 11 वर्षानंतर ती जेव्हा आई झाली. तिने आपल्या मुलाचं नाव वीर ठेवलं. यानंतर मंदिराने जुलै 2020 मध्ये एक मुलगी दत्तक घेतली, जिचं नाव तिने तारा ठेवलं आहे.


वयाच्या 48 व्या वर्षीही मंदिरा स्वत: ला ठेवते फिट
48 वर्षीय मंदिराने आपलं काम आणि फिटनेसमध्ये संतुलन राखलं आहे. एवढ्या वयातही ती फिट आहे हेच कारण आहे. मंदिराचा हा लूक तिला नियमित वर्कआउट आणि फिटनेसच्या डेडिकेशनमुळे मिळाला आहे. मंदिराच्या इन्स्टाग्रामवर असे अनेक फोटो असतील, ज्यात ती जिममध्ये वर्कआउट करताना दिसत आहे.


एका मुलाखतीतमध्ये मंदिराने सांगितलं की, तिच्या फिटनेसचं रहस्य म्हणजे दररोज सुमारे 10 किलोमीटर धावणे. ती म्हणाली की, ती कुठेही गेली तरी तिचे स्पोटर्स शू नेहमीच तिच्याबरोबर ठेवते.