मणिकर्णिकाची बॉक्स ऑफिसवर हाफ सेंच्युरी
मणिकर्णिकाला प्रेक्षकांची पंसती, कंगनाच्या भूमिकेचं कौतुक
मुंबई : Kangana Ranaut's Manikarnika Box Office: झांसीची राणी लक्ष्मीबाई यांच्या जीवनावर आधारीक सिनेमा मणिकर्णिकाला प्रेक्षकांकडून पसंती मिळत आहे. या सिनेमात अभिनेत्री कंगना ही लक्ष्मीबाई आणि अंकिता लोखंडे ही झलकारी बाईच्या भूमिकेत आहे. सिनेमा रिलीज झाल्याच्या पाच दिवसात सिनेमाने आतापर्यंत ५० कोटींचा आकडा पार केला आहे. मणिकर्णिकाने पहिल्या दिवसात बॉक्स ऑफिसवर ८.७५ कोटींचा गल्ला जमवला होता. बॉक्स ऑफिसवर सिनेमाने पहिल्या दिवशी कमाई कमी केली असली तर नंतर मात्र सिनेमाच्या कमाईत चांगली वाढ झाली. यानंतर दुसऱ्या दिवशी १८ कोटी, तिसऱ्या दिवशी १५ कोटी, चौथ्या दिवशी ५ कोटी तर पाचव्या दिवशी सिनेमाने ५.१० कोटींची कमाई केली आहे.
सिनेमाला रिव्यूव्ह देखील चांगले मिळाले. याचा फायदा सिनेमाला झाला. सिनेमात कंगनाच्या भूमिकेचं देखीली कौतुक झालं. राधा कृष्ण जगरालमुडी आणि कंगना रानौतने दिग्दर्शन केलेल्या या चित्रपटात १८५७ चा रणसंग्राम आणि झाशीच्या राणीच्या पराक्रमावर प्रकाशझोत टाकण्यात आला आहे. हा सिनेमा हिंदी, तामिळ आणि तेलुगू या तीन भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे. मुख्य म्हणजे क्वीन कंगनाच्या या चित्रपटाला देशभरात बऱ्याच स्क्रीनमध्ये सर्वाधिक शो मिळाले आहेत.
'मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी' हा सिनेमा २५ जानेवारी रोजी रिलीज झाला होता. या सिनेमात कंगनासोबत अंकिता लोखंडे, अतुल कुलकर्णी, जीशू सुरेश ओबेरॉय हे कलाकारही आहेत.