मुंबई:अभिनेत्री कंगणा राणैतचा 'मणिकर्णिका: द क्वीन ऑफ झांसी' सिनेमाची स्पेशल स्क्रीनिंग 18 जानेवारी रोजी आयोजीत करण्यात आली. राष्ट्रपति रामनाथ कोविंद यांच्या निवास स्थानी सिनेमा प्रदर्शित करण्यात आला. राष्ट्रपति रामनाथ कोविंद यांच्या साठी खास सिनेमाचे प्रदर्शन आयोजीत केले.राष्ट्रपतिंनी स्वतःच्या ट्विटर अकाऊंटवरुन स्क्रीनिंगचे फोटो शेअर केले आहेत.सिनेमा प्रदर्शनाच्या वेळी सिनेमाची संपूर्ण स्टारकास्ट उपस्थित होती. त्याचप्रमाणे सेन्सर बोर्डाचे अध्यक्ष प्रसून जोशी आणि भाजपचे वरिष्ठ नेता लालकृष्ण आडवाणी सुध्दा उपस्थित होते.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राष्ट्रपतिंनी स्वतःच्या ट्विटर अकाऊंटवरुन सिनेमासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.'राष्ट्रपति भवनात राष्ट्रपति रामनाथ कोविंद यांनी झासी ची राणी लक्ष्मीबाई यांच्या जीवनावर आधारित सिनेमा पाहिला त्यानंतर त्यांनी जमलेल्यांचा सत्कार केला'. स्पेशल स्क्रीनिंग नंतर कंगनाने सांगितले 'राणी लक्ष्मीबाई आपल्या नॅशनल हिरो आहेत, ही गोष्ट राणी लक्ष्मीबाई यांच्या पराक्रमाची आहे.


25 जानेवारी रोजी 'मणिकर्णिका: द क्वीन ऑफ झांसी' सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. अंकिता लोखंडे, अतुल कुलकर्णी, डैनी, सुरेश ओबरॉय मुख्य भूमीकेत झळकणार आहेत. कंगणा राणैत आणि कृष यांनी सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे.