Manisha Koirala:  दिल तो पागल है चित्रपट तर तुम्हाला आठवत असेलच. शाहरुख खान, माधुरी दीक्षित आणि करिश्मा कपूर यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तगडी कमाई केली होती. चित्रपटातील गाणी तर आजही प्रेक्षकांच्या तोंडी आहेत. तर, संवादही प्रेक्षकांच्या मनाला स्पर्शून जातात. मात्र, यश चोप्रा यांच्या या चित्रपटासाठी करिश्मा कपूर ही पहिली पसंत नव्हती. तर, मनीषा कोइराला हिला या चित्रपटासाठी पहिल्यांदा विचारण्यात आले होते. मात्र, तिने या चित्रपटासाठी नकार दिला. मात्र मनीषाला नंतर या निर्णयाचा मोठा पश्चित्ताप झाला. तिच्या या निर्णयामागे माधुरी दिक्षीत होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मनिषा कोइराला अलीकडेच संजय लीला भन्साळीच्या हिरामंडी या वेबसीरीजमध्ये दिसणार आहे. ही वेबसीरिज 1 मेरोजी नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे. यावेळी मनीषाने तिच्या एका चुकीबद्दल पश्चात्ताप व्यक्त केला आहे. इनसिक्युरीटीमुळं मनिषाला एक चित्रपट गमवावा लागला असल्याचा खुलासा तिने केला आहे. जर हा चित्रपट स्वीकारला असता तर तो माझ्या करिअरचा टर्निंग पाँइट ठरला असता. मात्र, एका चुकीमुळं तो निर्णय तिच्यावरच भारी पडला. 


मनिषा कोइरालाने इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत हा किस्सा सांगितला आहे. ती म्हणते आहे की, यश चोप्रा यांचा चित्रपट दिल तो पागल है ही मी नाकारली होती. कारण त्यात माझा सामना माधुरी दीक्षितसोबत होणार होता. यालाच घाबरून मनीषा कोइरालाने या चित्रपटातून माघार घेतली होती. 


मनीषाने म्हटलं आहे की, माझ्या काळातला प्रत्येक कलाकाराला तेव्हा यश जींसोबत काम करायचे असायचे. कारण ते त्यांच्या चित्रपटात महिलांना खूप सुंदर पद्धतीने कास्टिंग करायचे. मी यश जींच्या ऑफिसमध्ये गेली आणि त्यांना सांगितले की. सर, तुमच्या चित्रपटात हिरोइन बनणं हे माझं स्वप्न आहे पण सोलो. तुम्ही मला माधुरीविरोधात उभं करताय. आणि तेव्हा माझा हा निर्णय चुकला त्याचा मला आजही पश्चात्ताप होत आहे. 


दुसऱ्यांना मात्र ही चुक केली नाही


मनीषाने एकदा जी चुक केली होती. ती पुन्हा केली नाही. जेव्हा त्यांना लज्जा चित्रपट ऑफर झाला तेव्हा त्यांनी या चित्रपटासाठी नकार दिला नाही. राजकुमार संतोषीने दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात माधुरी दिक्षीतने देखील भूमिका साकारली होती. हा चित्रपट 2001मध्ये रिलीज झाला होता. दिल तो पागल है चित्रपटाच्या पाच वर्षांनंतर हा चित्रपट रिलीज झाला होता.