`मी सत्य स्वीकारलंय! माझ्या नशिबातच प्रेम नाही`, अभिनेत्रीचा खुलासा
`माझे खाजगी आयुष्य असो किंवा माझे करिअर. मी आता अशा स्थितीत आहे...`, सर्व काही असूनही अभिनेत्री जगतेय एकटी आयुष्य
मुंबई : झगमगत्या विश्वात कधी कोणचं सूत कोण सोबत जुळेल सांगता येत नाही. एक काळ होता जेव्हा अभिनेत्रीच्या खासगी आयुष्याबद्दल तुफान चर्चा रंगल्या. पण त्याचं नातं फार काळ टिकलं नाही. अशाच अभिनेत्रींपैकी एक म्हणजे मनिषा कोईराला (Manisha Koirala). मनिषाच्या आयुष्या 12 व्यक्ती आले, पण आजही अभिनेत्री एकटी आयुष्य जगते. माझ्या नशिबातच प्रेम नाही... असं अभिनेत्रीने एका मुलाखतीत सांगितलं आहे.
अभिनेत्री म्हणाली, 'बहुतेक माझ्या नशिबात स्त्री, पुरूषाचे प्रेमच नाही. पुन्हा एकदा एखाद्या चुकीच्या नात्यात अडकण्यापेक्षा हे बरे. कटू असले तरी हे सत्य मी स्वीकारेन. एखाद्या पुरूषाने मला दु:ख पोहोचवावे याला मी कधीही मान्यता देणार नाही, अशी भावना अभिनेत्री मनिषा कोईराला (Manisha Koirala ) हिने व्यक्त केली आहे.
परमेश्वराने मला नवी संधी दिली
मनिषा कोईराला पुढे म्हणते, 'माझे खाजगी आयुष्य असो किंवा माझे करिअर. मी आता अशा स्थितीत आहे की, मी कोणतेही चुकीचे पाऊल टाकू शकत नाही. परमेश्वराने मला पुन्हा एकदा नवी संधी दिली आहे'.
आपल्या भावाना व्यक्त करताना मनिषा सांगते, 'माझं जग वेगळंच झालं होतं. पण, जीवनात आलेल्या संघर्ष आणि अनुभवाने मला पुन्हा एकदा नवी संधी दिली. मला अधिक समजदार आणि सहनशील बनवले. तुमचं जिवन जेव्हा धोक्यात असतं तेव्हा, तुम्हाला खऱ्या आयुष्याचा अर्थ कळतो. असेही मनिषा विनम्रपणे सांगितलं.