Manisha Koirala on Oral Sex Scene with Shekhar Suman : बॉलिवूड अभिनेत्री मनीषा कोइराला ही सध्या हीरामंडी या तिच्या वेब सीरिजमुळे चर्चेत आहे. या वेब सीरिजमधील तिच्या अभिनयाची सगळीकडे चर्चा सुरु आहे. मनीषानं आता हीरामंडीच्या शूटिंग दरम्यानचा अनुभव सांगितला आहे. मनीषानं सांगितलं की जेव्हा तिला संजय लीला भन्साळीचा फोन आला होता तेव्हा ती नेपाळच्या घरी गार्डनिंग करत होती. मनीषानं सांगितलं की तिनं भन्साळीसोबत काम करण्याचं स्वप्न कधीच सोडून दिलं होतं. त्याच्याशिवाय तिनं सीरिजमधील ओरल सेक्सच्या सीनवर देखील वक्तव्य केलं आहे. या सगळ्याविषयी मनीषानं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'बॉलिवूड बबल'शी बोलताना मनीषानं सांगिचलं की "मी नेपाळमध्ये होते आणि गार्डनिंग करत होते तेव्हाच मला संजय लीला भन्साळीच्या ऑफिसमधून फोन आला. संजय म्हणाला, मनीषा तुझ्यासाठी एक चांगली भूमिका आहे, फक्त तू स्क्रिप्ट वाचून घे. मला खूप आनंद झाला कारण मी तर त्याच्यासोबत काम करण्याचं स्वप्न हे सोडून दिलं होतं."



मनीषाला पुढे विचारण्यात आले की तिला शेखर सुमनसोबत असलेल्या ओरल सेक्सच्या सीनविषयी माहित होतं का? तर मनीषानं उत्तर दिलं की "तिला संपूर्ण सीनविषयी माहित नव्हतं. मनीषा पुढे म्हणाली की भन्साळी जेपण करतो, तो त्या पटकथेत एक वेगळा एलिमेंट घेऊन येतो." 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


दरम्यान, मनीषाला पुढे तिन्ही खान विषयी विचारण्यात आलं म्हणजेच सलमान खान, शाहरुख खान आणि आमिर खान... तर तिनं सलमानची स्तुती करत सांगितलं की "सलमाननं जे बीइंग ह्यूमन सुरु केलं आहे, त्यामुळे गरिबांना खूप मदत होते. मला माहित आहे की अनेक कर्करुग्ण आहेत ज्यांना त्यानं मदत केली. इतकंच नाही तर तो डॉक्टरांना सांगतो की माझं नाव घेऊ नका की हे माझ्याकडून आहे." 


हेही वाचा : 34 वर्षांनंतर समोर आलं सलमाननं लिहिलेलं पत्र, करिअरचा शेवट कधी होईल सांगत भाईजान म्हणालेला...


या आधी शेखर देखील सांगितलं होतं की "भन्साळीनं या सीनमध्ये शेवटच्या क्षणी बदल केले होते. सीनमध्ये आधी होतं की नवाब पहिल्या कॅरिजपासूनच लघवी करेल आणि मग मल्लिकाजानसोबत मेकआउट करेल. भन्साळीनं मग त्यात बदल केले की नवाब हवेतच ओरल सेक्स सीन करेल. शेखरचं म्हणणं होतं की असा सीन या आधी कधीच शूट करण्यात आला नाही."