मनोज कुमार यांचे देशासोबत असलेले अनोखे नाते
मनोज कुमार यांनी शहीद, रोटी कपडा, मकान, उपकार,पूरब और पश्चिम, क्रांति यांसारखे सिनेमे केले.
मुंबई: देशभक्तीवरील सिनेमे म्हंटले की अभिनेता मनोज कुमार यांच्या नावाची चर्चा होणार हे साहजीकच आहे. मनोज कुमार यांना भारत कुमार या सुध्दा ओळखण्यात येते. कारण त्यांनी देशभक्तीवर एकापेक्षाएक सिनेमे तयार केले. त्याचप्रमाणे त्या सिनेमांमध्ये आपल्या अभिनयाची छाप पाडली.मनोज कुमार यांनी शहीद, रोटी कपडा, मकान, उपकार,पूरब और पश्चिम, क्रांति यांसारखे सिनेमे केले. 'बेईमान' सिनेमासाठी त्यांना सर्वश्रेष्ठ अभिनेता पुरस्कराने सन्मानीत करण्यात आले. आणि 'मकान' सिनेमासाठी सर्वश्रेष्ठ दिग्दर्शक पुरस्काराने नावाजण्यात आले.
मनोज कुमार नेहमी सिनेमाच्या माध्यमातून आपले देशप्रेम व्यक्त करायचे. 1965 साली आलेल्या शहीद सिनेमातील मनोज कुमार यांच्या अभिनयाला प्रेक्षकांकडून विशेष दाद मिळाली. शहीद हा सिनेमा भगत सिंग यांच्या जीवनावर आधारलेला होता. त्याकाळचे पंतप्रधान लालबहादुर शास्त्री सिनेमामुळे फार प्रेरीत झाले. 1965 साली पाकिस्तान सोबत युध्द झाले, त्यानंतर देशाचे मनोबळ वाढवण्यासाठी लालबहादुर शास्त्रींनी मनोज कुमार यांना देशभक्तीवरील सिनेमे बनवण्यास सांगितले."जय जवान जय किसान" अशा गण्यांच्या ओळींमुळे देशाचे मनोबळ वाढवण्यास मदत झली.
पंतप्रधानांच्या आग्रहा खातर मनोज कुमार यांनी 'उपकार' सिनेमाची निर्मिती केली. सिनेमातील 'मेरे देश की धरती' हे गाणे फार लोकप्रिय झाले. मनो़ज कुमार यांनी सिनेमाचे लेखण, दिग्दर्शन त्याचप्रमाणे सिनेमात अभिनय सुध्दा केले.'उपकार' सिनेमासाठी त्यांना सर्वश्रेष्ठ दिग्दर्शक म्हणून फिल्मफेअर पुरस्कारने सन्मानीत करण्यात आले.
1992 साली भारत सरकेरने त्यांना पद्मश्री पुरस्कराने सन्मानीत करण्यात आले. 90 व्या शतकात मैदान ए जंग त्यांचा शेवटचा सिनेमा प्रदर्शित झाला.सिनेमात ते कमगारांच्या हक्कासाठी लढताना दिसले.2016 मध्ये त्यांना सिनेमा जगतातला सर्वात मोठा पुरस्कार दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरविण्यात आले.