Skyforce Upcoming Movie: अक्षय कुमार (Akshay Kumar) सध्या लाईमलाईटमध्ये आहे. त्याचा चित्रपट ‘स्कायफोर्स’ लवकरच प्रदर्शित होणार असून, चित्रपटाची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. सध्या कलाकार चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. काही दिवसांपूर्वीच ‘स्कायफोर्स’चा ट्रेलर प्रदर्शित झाला होता. या भन्नाट ट्रेलरला चाहत्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला. पण चित्रपटाच्या रिलीजला फक्त 15 दिवस राहिले असताना मेकर्सची चिंता वाढली आहे. नुकताच एका गाण्याचा टीझर रिलीज करण्यात आला, त्यानंतर गीतकार मनोज मुंतशिर (Manoj Muntashir) यांनी निर्मात्यांना कायदेशीर कारवाईची धमकी दिली आहे.


हे काय लेखकाचं नाव गायब?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अक्षय कुमार अभिनीत ‘स्कायफोर्स’ चित्रपटामधील एक गाणं लवकरच प्रक्षकांच्या भेटीला येणार. 'माये' असं त्या गाण्याचं नाव. जिओ स्टुडिओने 'एक्स'वर या गाण्याचा टीझर प्रदर्शित केला. मात्र, यामध्ये फक्त 'तनिष्क बागची' आणि 'बी प्राक' यांना क्रेडिट देण्यात आलं आहे. हे पाहून मनोज मुंतशिर नाराज झाले आहेत. त्यांनी एका ट्विटद्वारे आपली नाराजी व्यक्त केली आहे.


नेमकं काय घडलं?


मनोज मुंतशिर यांनी आपल्या ट्विटमध्ये जिओ स्टुडिओ, मॅडॉक फिल्म्स आणि सारेगामा ग्लोबल यांना टॅग केलं आहे. त्यांनी लिहिलं की “हे गाणं केवळ गायलेलं आणि कंपोज केलेलं नाही, तर एका अशा व्यक्तीने लिहिलं आहे, ज्याने या गाण्यासाठी रक्तपाणी एक केलं आणि मेहनतीने लिहिलं आहे. ओपनिंग क्रेडिटमधून लेखकाचं नाव हटवणं चुकीचं आहे, हा प्रकर लेखकांचा अनादर करण्यासारखा आहे. जर हे तातडीने सुधारलं गेलं नाही, तसेच प्रदर्शित होणाऱ्या गाण्याशी संबंधित बदल केले नाहीत, तर मी या गाण्यावरून माझी मान्यता मागे घेईन.” याच दरम्यान त्यांनी कायदेशीर कारवाईचा इशारा देखील दिला. शेवटी लिहिलं - Shame.



निर्माते गाण्यात मुंतशिर यांना क्रेडिट देतील का?


सध्या तरी ‘स्कायफोर्स’च्या निर्मात्यांनी यावर कोणतंही उत्तर दिलेलं नाही. मात्र, गाणं रिलीज होण्यापूर्वी ते मनोज मुंतशिर यांना क्रेडिट देतील की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. जर तसं झालं नाही, तर अक्षय कुमारच्या या चित्रपटासाठी अडचणी वाढू शकतात. मेकर्सना देखील हे प्रकरण सोडवाणं भाग आहे. परंतु मनोज मुंतशिर यांचा मुद्दा गंभीरपणे घेतला गेला आहे का, हे गाणं रिलीज झाल्यावरच स्पष्ट होईल.


हे ही वाचाः Sholay : सेन्सॉरच्या फटकारल्यानंतर कापला गेला गब्बरचा 'तो' सीन 49 वर्षानंतर VIRAL


सिनेमागृहांमध्ये कधी पोहोचणार 'स्कायफोर्स'?


या चित्रपटातून वीर पहारिया सिनेसृष्टीत पदार्पण करत असून, तसेच सारा अली खान आणि निम्रत कौरदेखील चित्रपटात दिसणार आहेत. हा चित्रपट 24 जानेवारी 2025 ला म्हणजे प्रजासत्ताक दिनाच्या दोन दिवसांपूर्वीच प्रदर्शित होणार आहे. प्रदर्शनापूर्वीच वादात अडकलेल्या या चित्रपटाला कसा प्रतिसाद देतील हे आता रिलीजनंतरच नंतरच पाहायला मिळेल