Manoj Tiwari : वयाच्या 50 व्या वर्षी दुसऱ्यांदा वडिल झाले मनोज तिवारी
पोस्ट शेअर करत ही आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली.
Bhojpuri Actor Manoj Tiwari : भोजपुरी अभिनेते आणि भाजप नेते मनोज तिवारी (Manoj Tiwari) यांच्या घरी चिमुकल्या पाहुणीचं आगमन झालं आहे. नुकतीच त्यांनी एक पोस्ट शेअर करत ही आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली. सध्या मनोज तिवारी यांची ही पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. (Manoj Tiwari Surbhi Tiwari)
मनोज तिवारी यांनी पोस्ट करत कॅप्शनमध्ये, कळविण्यात अत्यंत आनंद होत आहे की, लक्ष्मीनंतर माझ्या घरी सरस्वतीचं आगमन झालं आहे.. आज घरात एका लाडक्या मुलीचा जन्म झाला आहे.. आपण सर्वांनी तिला आशीर्वाद द्यावा.. सुरभी-मनोज तिवारी. सध्या सर्वत्र त्यांच्या या पोस्टची जोरदार चर्चा सुरु आहे. (Manoj Tiwari Family)
मनोज तिवारी यांचं सुरभी यांच्यासोबत दुसरं लग्न आहे. त्यांचं पहिलं लग्न 1999 साली झालं होतं. मनोज यांच्या पहिल्या पत्नीचं नाव राणी आहे. राणी आणि मनोज यांना मुलगी देखील आहे. ती तिच्या आईसोबत मुंबईत राहते. (Manoj Tiwari daughter)
पहिल्या पत्नीसोबत घटस्फोट झाल्यानंतर मनोज यांनी 2020 साली लॉकडाऊन दरम्यान सुरभी तिवारी यांच्यासोबत लग्न केलं. महत्त्वाचं म्हणजे मोठी मुलगी जियाच्या सांगण्यावरून त्यांनी लग्न केल्याचं सांगितलं जातं. मनोज आणि सुरभी यांना एक मुलगी आहे. तिचं नाव सान्विका असं आहे. आता मनोज आणि सुरभी यांच्या आयुष्यात नव्या पाहुण्याचं आगमन होणार आहे. (Manoj Tiwari Second Wife)
मनोज तिवारी हे लोकप्रिय भोजपुरी अभिनेते आहेत. 'ससुराल बडा पैसावाला' या सिनेमातून त्यांनी कलाविश्वात पदार्पण केलं. त्यांचं 'धरती काहे पुकार के', 'भोले शंकर', 'जनम जनम के साथ', 'ऐलान', 'अंधा' असे अनेक सिनेमे गाजले आहेत. अभिनेता असण्यासोबतच राजकीय विश्वातदेखील ते तितकेच कार्यरत आहेत.