मुंबई : मराठी अभिनेत्री मानसी नाईक (Mansi Naik) ही तिच्या उत्तम नृत्यशैलीसाठी ओळखली जाते. मानसीचं ‘बघतोय रिक्षावाला’ (Baghtoy Rikshawala), ‘बाई वाड्यावर’ ही गाणी चांगलीच लोकप्रिय झाली होती. खरंतर या गाण्यांमुळे मानसीला घराघरात ओळख मिळाली. मानसी ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत मानसी चाहत्यांच्या संपर्कात राहते. काही दिवसांपूर्वी मानसी आणि तिचा पती प्रदीप खरेरा यांच्या घटस्फोटाच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. (Mansi Naik Husband Pradeep Kharera) दरम्यान, घटस्फोटाच्या चर्चेत मानसीनं सोशल मीडियावर आणखी एक पोस्ट शेअर केली आहे. (Mansi Naik Social Media)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मानसीनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. तिनं शेअर केलेल्या ब्लॅक अँड व्हाईट व्हिडीओमध्ये मानसी तिच्या पाळीव मांजरीसोबत दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करत 'समझदारी जिंदगी को बेरंग कर देती है… धन्यवाद या सोबत तिनं #Universe हा हॅशटॅग वापरला आहे. या व्हिडीओच्या बॅकग्राउंडला ‘प्रेम में तोहरे…’ हे ‘बेगम जान’ चित्रपटातील गाणं वाजताना ऐकू येत आहे. 


मानसीनं शेअर केलेला व्हिडीओ पाहा -


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


मानसीसा पती प्रदीप खरेरा हा एक बॉक्सर आणि मॉडेल (Mansi Naik Husband Profession)आहे. बरीच वर्षे डेट केल्यानंतर त्यांनी सप्तपदी घेण्याचा निर्णय घेतला होता. नेहमीच पतीसोबत फोटो शेअर करणारी मानसी गेल्या काही दिवसांपासून प्रदीपसोबतचे फोटो शेअर करत नसल्याचे काही नेटकऱ्यांच्या लक्षात आले आहे. फक्त मानसी नाही तर तिचा पती प्रदीप देखील नेहमीच मानसीसोबत फोटो शेअर करायचा. (Mansi Naik Husband Is Boxer and Model)आता त्याच्या अकाऊंटवरही मानसीचे फोटो दिसत नाही असे म्हणत काही नेटकऱ्यांनी ती विभक्त झाले का किंवा त्यांच्यात दुरावा आला का असा प्रश्न केला आहे. दरम्यान, त्या दोघांनी या बातमीला दुजोरा दिलेला नाही. मानसी आणि प्रदीप 19 जानेवारी 2021 रोजी लग्नबंधनात अडकले होते. (mansi naik and husband pradeep kharera got divorced rumuord start after actress second viral video) 


हेही वाचा : मराठमोळ्या मुलीवर जडलेला बिग बींचा जीव; मग लग्न का होऊ शकलं नाही?


मानसीनं शेअर केलेल्या पोस्टवर नेटकऱ्यांनी कमेंट करत तिला ट्रोल केल आहे. एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, 'एकदाच स्पष्ट सांग.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'नक्की हिच सुरु काय आहे.'