मुंबई : फेमिना मिस वर्ल्ड हा किताब जिंकणारी मानुषी छिल्लरने पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. मानुषीने संपूर्ण कुटुंबियांसोबत पंतप्रधान मोदींची भेट घेतली. पंतप्रधानांना भेटण्यासाठी खूप उत्साहीत असल्याचं तिने ट्विट केलं होतं.


सिद्धिविनायकाचं दर्शन


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चीनमधून भारतात परतल्यावर तिने आधी मुंबईतील सिद्धीविनायक मंदिरात जाऊन गणरायाचं दर्शन घेतलं आणि मिळालेल्या यशाबद्दल कुटुंबियांसोबत तिने देवाचे आभार मानले.


१७ वर्षांनी भारतासाठी पटकावला किताब


तब्बल १७ वर्षांनी मिस वर्ल्ड हा किताब मानुषीने भारतासाठी पटकावला आहे. मानुषीची चर्चा सगळीकडेच अगदी जोरदार रंगत आहे. अगदी तिच्या खाजगी आयुष्याबरोबरच तिच्या करिअरची देखील चर्चा होत आहे.


जगभरात नावाची चर्चा


मानुषी बॉलिवूडमध्ये प्रवेश करणार का? हा प्रश्न साऱ्यांनाच पडला. त्याचप्रमाणे तिचा आतापर्यंतचा प्रवास हा देखील वेगळा असल्याचं म्हटलं जातं. वयाच्या अवघ्या २० व्या वर्षी जगभरात तिच्या नावाची चर्चा होणं ही काही सामान्य बाब नाही. मानुषीचा एक सामान्य विद्यार्थिनी ते फेमिना मिस वर्ल्ड २०१७ पर्यंतचा प्रवास साधा नसून प्रेरणादायी आहे.


वैयक्तीय आयुष्यात ठेवते डिसिप्लीन


वैद्यकीय अभ्यास करत असतांना मिस इंडियासाठी मानुषीची निवड केली गेली. आपल्या खाण्याच्या सवयीपासून आपल्या शरीराचा लूक, डॉक्टरकीचा अभ्यास आणि क्लासेस सगळं सांभाळून तिने हा खिताब मिळवला. तिच्या आयुष्यात ती खूपच डिसिप्लीन आहे.