आपल्या होणाऱ्या पतीला भेटू इच्छिते मिस वर्ल्ड मानुषी छिल्लर
नुकतीच मिस वर्ल्ड झालेली मानुषी छिल्लरने मिस वर्ल्डचा मान मिळाल्यानंतर म्हटलं होतं की, `जिंकण्यासाठी एक सुंदर हृदय असणं सुद्धा महत्वाचं आहे.`
मुंबई : नुकतीच मिस वर्ल्ड झालेली मानुषी छिल्लरने मिस वर्ल्डचा मान मिळाल्यानंतर म्हटलं होतं की, 'जिंकण्यासाठी एक सुंदर हृदय असणं सुद्धा महत्वाचं आहे.'
मिस वर्ल्ड 2017 चा मान मिळवल्यानंतर मानुषीने प्रथमच प्रसारमाध्यमांशी बोलतांना अनेक प्रश्नांना उत्तरे दिली. यावेळेस मानुषीने एका प्रश्नाचं उत्तर देत असतांना आपल्याला आपल्या होणाऱ्या पतीला भेटायचं असल्याचं म्हटलं होतं.
मानुषीने दिले उत्तर
मानूषीने अलीकडेच एका मुलाखतीत म्हटले आहे की, बरेच लोक माझ्या साखरपुड्याबद्दल मला विचारत आहेत. सोबतच हे देखील म्हटलं जातंय की माझा साखरपुडा होणार आहे. पण मानुषीने आपल्या अंदाजामध्येच याला उत्तर दिलं. तिने म्हटलं की, 'मला वाटत होतं की माझा साखरपुड्याबद्दल मला प्रश्न विचारला जावा पण तो कोणीच विचारला नाही. पण मला स्वतःला नाही माहित की माझा साखरपुडा कोणासोबत होणार आहे.'
माझ्या होणाऱ्या पतीला भेटू इच्छिते
पुढे ती म्हणाली की, 'मी आता फक्त २० वर्षांची आहे. काय मला बघून असं वाटतं की माझं लग्न झालं आहे. मी आता माझ्या होणाऱ्या पतीला भेटू इच्छिते आणि हे काम आता सोपं झालं आहे.' मानुषीने मात्र तिच्या साखरपुड्याच्या सगळ्या चर्चा खोट्या ठरवल्या आहेत.