प्रसिद्ध अभिनेत्याच्या नावाने डोनेशनची मागणी, पाहा कसा सुरु आहे स्कॅम?
स्टार प्रवाह वाहिनीवरील `ठरलं तर मग` या मालिकेला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. या मालिकेमुळे त्याला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली.
Amit Bhanushali Fake Account : स्टार प्रवाह वाहिनीवरील 'ठरलं तर मग' या मालिकेला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. या मालिकेतून प्रसिद्धीझोतात आलेला अभिनेता म्हणून अमित भानुशाली याला ओळखले जाते. या मालिकेत त्याने अर्जुन हे पात्र साकारलं आहे. या मालिकेमुळे त्याला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. पण आता अमित भानुशालीसोबत धक्कादायक घटना घडली आहे. त्याने स्वत: पोस्ट करत चाहत्यांना याबद्दल सतर्क केले आहे.
अमित भानुशाली याने नुकतंच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टद्वारे त्याने चाहत्यांना सतर्क करण्याचा प्रयत्न केला आहे. अमितच्या लोकप्रियतेचा फायदा घेऊन काही अज्ञातांकडून त्याच्या चाहत्यांची फसवणूक करण्याचा प्रयत्न करण्यात आला. अमितने इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर करण्यात आली. यात त्याने एक फोटो शेअर केला आहे. यात त्याने त्याच्या नावाने सुरु असलेल्या एका फॅनपेजवरुन पैशांची मागणी केली जात आहे.
हेही वाचा : कोणी ग्रॅज्युएट तर कोणी मास्टर्स, जाणून घ्या मुकेश अंबानींसह त्यांच्या कुटुंबियांचं शिक्षण?
aamit.bhanushali_fc असे त्याच्या फॅनपेजचे नाव आहे. 'कोणी कोणी १०, २०, ५०, १०० रुपये पाठवले? लवकर पाठवा आणि मला कळवा. पैसे पाठवा, गरज आहे आणि डोनेट पण करायचे आहे.' अशी मागणी यावरुन करण्यात आली आहे. या पेजवरुन शेअर करण्यात आलेल्या स्टोरीमध्ये पैसे पाठवण्यासाठीचा स्कॅनरही देण्यात आला आहे. याबद्दल त्याने स्पष्टीकरण दिले आहे.
'मला या डोनेशनबद्दल काही माहीत नाही. कृपया कोणी पैसे पाठवू नका. Alert! हा मी नाही आहे. माझा या अकाउंटशी काहीही सबंध नाही. विनंती करतो की कोणताही व्यवहार करू नये किंवा पैसे पाठवू नये' असे अमित भानुशालीने म्हटले आहे. त्यासोबतच त्याने पोस्ट करत या फॅनपेजशी काहीही संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच त्याने या बनावट फॅनपेजचा स्क्रिनशॉट शेअर चाहत्यांना जागरुक राहण्याचा सल्ला दिला आहे. सध्या त्याची ही पोस्ट व्हायरल होत आहे.
दरम्यान स्टार प्रवाहच्या 'ठरलं तर मग' मालिकेत अमितसह अभिनेत्री जुई गडकरी मुख्य भूमिकेत झळकत आहे. यात अर्जुन-सायलीच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची कथा प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे. सध्या या मालिकेत अर्जुनच्या वडिलांना खोट्या केसमध्ये फसवून अटक केल्याचे कथानक पाहायला मिळत आहे.