कोणी ग्रॅज्युएट तर कोणी मास्टर्स, जाणून घ्या मुकेश अंबानींसह त्यांच्या कुटुंबियांचं शिक्षण?
मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांच्या कुटुंबाविषयी विविध गोष्टी जाणून घ्यायचं कुतूहल अनेकांना असते. अंबानी कुटुंबाचे शिक्षण किती? याची माहिती समोर आली आहे.
मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांच्या कुटुंबाविषयी विविध गोष्टी जाणून घ्यायचं कुतूहल अनेकांना असते. अंबानी कुटुंबाचे शिक्षण किती? याची माहिती समोर आली आहे.
1/10
2/10
3/10
मुकेश अंबानी
4/10
नीता अंबानी
गुजराती कुटुंबात जन्मलेल्या नीता अंबानी यांचा विवाह 1985 मध्ये मुकेश अंबानी यांच्यासोबत झाला. नीता अंबानी यांनी मुंबईच्या नरसी मोंजी कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्समधून पदवी प्राप्त केली. त्यासोबत त्यांनी भरतनाट्यमचेही प्रशिक्षण घेतले असून त्या भरतनाट्यमच्या शिक्षिकाही आहेत. नीता अंबानी या धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलच्या संस्थापिका आहेत.
5/10
आकाश अंबानी
6/10
श्लोका मेहता-अंबानी
मुकेश अंबानी यांची थोरली सून आणि आकाश अंबानीची पत्नी श्लोका मेहताही उच्चशिक्षित आहे. श्लोका मेहताने आकाशसोबत धीरूभाई अंबानी स्कूलमधून शिक्षण पूर्ण केले. तिने प्रिन्स्टन विद्यापीठातून उच्च शिक्षण पूर्ण केलं. श्लोकाने लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्समधून लॉमध्ये मास्टर्स डिग्री प्राप्त केली आहे.
7/10
अनंत अंबानी
मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी यानेही धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमधून शालेय शिक्षण पूर्ण केलं आहे. यानंतर त्याने अमेरिकेतील ब्राऊन विद्यापीठातून पदवी शिक्षण पूर्ण केलं. ब्राउन युनिव्हर्सिटीमधून पदवी घेतल्यानंतर तो रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये रुजू झाला. सध्या अनंत अंबानीच्या खांद्यावर रिलायन्स एनर्जीची जबाबदारी आहे.
8/10
राधिका मर्चंट
9/10
ईशा अंबानी
मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांची एकुलती एक मुलगी ईशा अंबानी ही रिलायन्स ग्रुपमध्ये महत्त्वाची जबाबदारी सांभाळत आहे. ईशा अंबानीने आपले सुरुवातीचे शिक्षण मुंबईतील धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमधून केलं. यानंतर तिने अमेरिकेच्या येल विद्यापीठातून मानसशास्त्रात पदवी घेतली. त्यासोबतच तिने स्टॅनफोर्ड विद्यापीठातून एमबीएची पदवीही घेतली आहे.
10/10