मुंबई : अभिनेते आणि नाट्य दिग्दर्शक गिरीश साळवी यांचे निधन झाले आहे. दीर्घ आजाराने गिरीश साळवी यांचं निधन झाले आहे. साळवी यांचे वरळी येथे त्यांच्या घरी निधन झाले आहे. पहिला राजा, समाधी, बाप हा बापच असतो, जाता नाही जात, बुद्धीबळ ही त्यांची रंगभूमीवर गाजलेली नाटकं होती. एक प्रयोगशील अभिनेता, एक चांगला दिग्दर्शक आणि निर्माता अशी ओळख असलेले गिरीश साळवी काळाच्या पडद्याआड गेल्यामुळे नाट्यविश्वात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

७२ पावसाळ्यांचा जमाखर्च हा दीर्घांक, बुद्धिबळ आणि झब्बू, इंदू काळे सरला भोळे, खेळीमेळी, दावेदार ही त्यांची नाटकं विशेष गाजली. या नाटकांमधील अभिनय प्रेक्षकांच्या मनात अजुनही घर करुन आहे.  बुद्धिबळ आणि झब्बू या नाटकात त्यांच्या अभिनयाची कामगिरी मोठी असल्याचे दिसून आले.


तसेच ७२ पावसळ्यांचा जमाखर्च या दीर्घांकातलाही त्यांचा अभिनय सहजसुंदर होता. त्यांचा सहज साधा वावर, स्पष्ट उच्चार आणि अचूक टायमिंग ही त्यांची खास वैशिष्ट्य होती. त्यामुळे त्यांची अभिनयावर वेळगळीच छाप दिसून येत होती. त्यांच्या जाणाण्याने कलाविश्वाचा आणि नाट्यसृष्टीचे मोठे नुकसान झाले आहे, अशी प्रतिक्रीया अनेकांनी व्यक्त केली.