Marathi Actor Got Angry Over Pune Drugs : पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरणानंतर आता एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यात एक अल्पवयीन मुलगा ड्रग्स घेताना दिसतोय. या व्हिडीओनंतर ज्या पबमधील तो व्हिडीओ होता त्यावर कारवाई करण्यात आली आहे. इतकंच नाही तर तो पब अनधिकृत असल्याचं देखील समोर आलं होतं. आता या दोन्ही प्रकरणात अंमली पदार्थ आणि ड्रग्स असं काहीसं चित्र पाहायला मिळत असताना. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पोलीस आणि प्रशासनाला राज्यातील अनधिकृत बांधकाम, बेकायदेशीर पब्ज आणि बारवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतर त्यावर सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली असताना अभिनेता सौरभ गोखलेनं देखील एक पोस्ट शेअर केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एकनाथ शिंदे यांनी थेट सांगितलं की अनधिकृत बांधकाम आणि अमली पदार्थां विरोधावर बेधडक बुलडोझर चालवा. बुलडोझर चालवत असताना कोणालाही सूट देऊ नका. मुख्यमंत्र्यांचा आदेश आल्यानंतर फक्त पुण्यातील नाही तर राज्यातील अनेक पब्ज आणि बारवर महापालिकेकडून बुलडोजर चालवण्यात आले. सौरभ गोखलेनं त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवरून ही पोस्ट शेअर केली आहे. 



हेही वाचा : 'या' भीतीपोटी अमिताभ बच्चन यांनी पाहिली नाही वर्ल्डकपची फायनल! भारताच्या विजयानंतर बिग बींचा खुलासा


या पोस्टमध्ये तो म्हणाला, 'शहरातील अनेक बेकायदेशीर पब्स आणि बार्सवर महापालिकेची कारवाई!! पण, हे अनधिकृत बार आणि पब बांधू देऊन इतकी वर्ष ज्यांनी मोकाट चालू दिलं त्या जांदूगारांचा कौतुक सोहळा कधी.' गौरवच्या पोस्टनं सगळ्यांची मने जिंकली आहेत. दरम्यान, सौरभ हा मराठी चित्रपटसृष्टीतील एक लोकप्रिय अभिनेता आहे. त्यानं आजवर अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केलं आहे. 


काय आहे पुणे ड्रग्स प्रकरण!


पुण्यामध्ये याआधी अमली पदार्थांच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत. पुण्याच्या ससून रुग्णालयात ड्रग रॅकेट उघडकीस आल होतं. ड्रग्स माफिया ललित पाटील आणि संदीप धूनिया यांच्याद्वारे चालवण्यात येणाऱ्या रॅकेट मधून मार्च 2024 मध्ये तब्बल 3 हजार 674 कोटींचे एमडी जप्त करण्यात आलं होतं. पुणे पोलिसांनी कुरकुंभ येथील कारखान्यातून आंतरराष्ट्रीय पातळीवरील ड्रग्ज रॅकेट उघडकीस आणलं होतं. त्याआधी म्हणजे 2023 मध्ये वर्षभरात अमली पदार्थ सेवन, तस्करी यांनी विक्रीचे सुमारे दीडशे पेक्षा जास्त गुन्हे नोंदवले गेले आहेत. पुण्यातील एल थ्री बार आणि पब मधील धांगडधिंगा समोर आल्यानंतर पोलिसांनी कारवाई केलीय.