Marathi Actor name his Daughter after Irrfan Khan : बॉलिवूड दिवंगत अभिनेता इरफान खान हे नेहमीच त्याच्या चाहत्यांच्या मनात राहिल. इरफान खान यांनी त्यांच्या करिअरमध्ये काही ठरावीक चित्रपट केले पण त्यांनी जे काही केले ते सगळ्यांच्या मनात एक छाप सोडून गेले. फक्त त्यांच्या चाहते नाही तर अभिनय क्षेत्रातील अनेकांना आजही इरफान खान यांची आठवन येते. अनेकांनी इरफान खान यांच्या आठवणीत अनेक गोष्टी केल्या. त्यात आता आणखी एका मराठी कलाकाराची भर पडली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मराठमोळा अभिनेता ऋषिकेश शेलार हा त्याच्या सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेमुळे प्रेक्षकांच्या नजरेत बसला. ऋषिकेशच्या अभिनयाचे नेहमीच कौतुक होते. त्याला अभियनासाठी प्रवृत्त करणारे किंवा अभिनयाचे नकळत धडे देणारे कलाकार म्हणजे इरफान खान. इरफान खान हे ऋषिकेशचे आवडते कलाकार आहेत. दरम्यान, नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत ऋषिकेशनं इरफान खान यांना या आयुष्यात भेटू न शकल्याची खंत व्यक्त केली आहे. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


ऋषिकेशनं ही मुलाखत ‘राजश्री मराठी’ च्या ‘त्याची गोष्ट’ या कार्यक्रमात हजेरी लावली होती. यामुलाखतीत ऋषिकेशनं अभिनेते इरफान खान यांना फोन केला होता. त्यावेळी त्यांच्यात जे बोलणं झालं त्यानं सगळ्यांचे लक्ष वेधलं आहे? ऋषिकेश यावेळी काय म्हणाला याविषयी जाणून घेऊया... सुरुवातीला 'नमस्कार, इरफान कसा आहेस माझ्या भावा?' असं म्हणत त्यानं सुरुवात केली. पुढे ऋषिकेश म्हणाला, 'माझ्यासारख्या असंख्य अभिनेत्यांना तू मोठ्या भावासारखा आहेस. तू फार लवकर गेलास पण, आमच्यामध्ये आजही तू आहेस…आमच्या सगळ्यांमध्ये आज एक-एक इरफान आहे आणि हीच तुझी खरी ताकद आहे. तू जयपूरचा अन् कोण कुठला मी सांगलीचा एक मुलगा…तू गेल्यानंतर खूप रडलो. माझ्यासारखे असंख्य लोक त्यादिवशी रडले असतील. इरफान तू कॅमेराचा एक वेगळा दृष्टीकोन दाखवून दिलास म्हणून ग्रेट आहेस. तू दाखवलेल्या वाटेवरून पुढे जाणं हे आता सोपं वाटतंय पण, ज्या पद्धतीचं काम तू केलंस त्याची तुलना केलीच जाऊ शकत नाही. तुझ्यासारखं काम करणं खरंच अवघड आहे. स्वत:वरचा विश्वास ढळू न देता तू वेगळं काम करत राहिलास आणि आज लोक बोलतात इरफान खान साहेबांसारखं काम करा…ही खरचं किती मोठी गोष्ट आहे.'


हेही वाचा : समांथाला विजय देवरकोंडासोबत रोमान्स करताना पाहून नागा चैतन्यला रहावलं नाही; थिएटरच्या बाहेर आला अन्...


पुढे कधी भेट झाली नाही याविषयी बोलताना इरफान म्हणाला, 'या जन्मात आपली भेट होऊ शकली नाही ही खंत माझ्या मनात कायम राहिल! तू नेहमी म्हणतोस ना, ‘जहाँ जायेगा वहीं रौशनी लुटाएगा किसी चिराग़ का अपना मकाँ नहीं होता’ तू तिथेही सर्वांना प्रकाश देत असशील. तुझ्या नावावरून मी माझ्या मुलीचं नाव ठेवलंय, त्यामुळे तिच्या डोळ्यात मी जेव्हा-जेव्हा बघेन… तेव्हा मला चांगलं काम करण्याची प्रेरणा मिळेल. मी कधीच पाट्या टाकणार नाही.' संपूर्ण फोन कॉलमध्ये ऋषिकेश भावूक झाल्याचे आपल्याला पाहायला मिळते.