मुंबई : झी मराठीच्या 'चला हवा येऊ द्या' कार्यक्रमाने महाराष्ट्राला पोट धरून हसायला लावलं. 'हसताय ना? हसायलाच पाहिजे...' असा प्रश्न विचारत या कार्यक्रमाने प्रेक्षकांशी आपुलकीचं नातं जोडलं. बॉलिवूडला मराठी कार्यक्रमाची दखल घ्यायला भाग पाडली ती याच कलाकारांनी. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या कार्यक्रमात डॉ. निलेश साबळे, भाऊ कदम, भारत गणेशपुरे, श्रेया बुगडे आणि कुशल बद्रिके ही मंडळी आहेत. हे कलाकार विनोदी असले तरी त्यांनी कायमच आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत. संपूर्ण महाराष्ट्राला खळखळवून हसवणारा अभिनेता कुशल बद्रिकेने एक पोस्ट इंस्टाग्रामवर शेअर केली आहे.


यामध्ये कुशलने एक फोटो शेअर केला आहे. या फोटोसोबतच कुशलने कॅप्शनमध्ये लिहीलं आहे की, ''वेगळ्या दृष्टिकोनाचा चष्मा घेतलाय यंदा, आता माणसं पारखून घेईन म्हणतोय.'' त्याची ही पोस्ट करताच सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली आहे. कुशलच्या या पोस्टवर चाहते लाईक्स कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. 



एका चाहत्याने कमेंट करत लिहीलं आहे की, ''काय राव असे सात चष्मे सात जन्म घेऊन माणसं पारखायचा प्रयत्न केला तरी ते शक्य नाही.'' तर अजून एकाने कमेंट करत म्हटलंय की, असा चष्मा आपले आजोबा घालत् होते आणी त्यांना माणसांची चांगलीच पारख असायची ........ आता तुम्ही पण नक्कीच माणस पारखण्यात पटाईत व्हाल... अशा अनेक प्रकारच्या कमेंट्स कुशलच्या या पोस्टवर पहायला मिळत आहेत. अनेकांना कुशलची ही पोस्ट जरी आवडली असली तरी अनेकजण मात्र कुशलच्या पोस्टवर चिंता व्यक्त करत आहेत.