थर्टी फस्ट पार्टीत एकच 'प्याला' अंगावर आला? हँगओव्हर उतरवण्यासाठी वापरा 'या' 5 टिप्स

Hangover Overcome Home Remedies : 2025 हे नवीन वर्ष सुरु व्हायला आता अवघे काही तास उरले आहेत. बरेचजण नवीन वर्षाचे स्वागत करताना आपल्या मित्र मंडळी, कुटुंब इत्यादींसमवेत जंगी पार्टी करतात. बऱ्याचदा पार्टीत प्यायलेल्या प्याला अंगावर येतो. दुसरा दिवस उजाडला तरी अनेकांचा हँगओव्हर उतरत नाही. अशावेळी तुम्ही हँगओव्हर उतरवण्यासाठी काही घरगुती उपाय करू शकता. 

| Dec 31, 2024, 15:59 PM IST
1/7

हँगओव्हर उतरवण्यासाठी नारळाचं पाणी अगदी बेस्ट ठरतं. दारू प्यायल्यानंतर डोके दुखी, चक्कर येणे, हृदयाची गती वाढणे अशा समस्या निर्माण होतात. या समस्या होणार नाहीत जेव्हा तुम्ही नारळ पाण्याचे सेवन कराल. नारळ पाणी शरीरातील इलोक्ट्रोलाइट्सची कमतरता दूर करते. 

2/7

जर दारू प्यायल्यावर तुम्हाला खूपच जास्त हँगओव्हर झाला असेल तर कॉफी किंवा चहाचे सेवन करू शकता. सकाळी उठल्यावर चहा, कॉफी प्यायल्याने यात असलेल्या कॅफिनमुळे हँगओव्हर उतरतो. 

3/7

हँगओव्हर उतरवण्यासाठी तुम्ही गरम पाण्यात आल्याचे काही तुकडे टाकून उकळवा आणि कोमट असतानाच त्या पाण्याचे सेवन करा. आल्यामध्ये अँटी इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात यामुळे उलटी अपचन इत्यादी समस्या दूर होतात. 

4/7

केळ्याचा ज्यूस म्हणजेच बनाना शेक हा सुद्धा हँगओव्हर उतरवण्यासाठी लाभदायक ठरतो. तुम्ही याऐवजी एवोकाडो, सफरचंद इत्यादी फळांचे सेवन करू शकता. सफरचंदमध्ये असणारे काही गुणधर्म हे तीव्र डोकेदुखी दूर करण्यास मदत करतात. 

5/7

सकाळी उठताच हँगओव्हर दूर करण्यासाठी तुम्ही लिंबू पाण्याचे सेवन करू शकता. लिंबूमध्ये व्हिटॅमिन सी असते ज्यामुळे दारूचा हँगओव्हर लवकर उतरण्यास मदत होते. लिंबू पाण्यात मीठ, मध इत्यादी मिक्स करून ग्लास भरून प्या. 

6/7

पुदीन्याची 3 किंवा 4 पानं गरम पाण्यात टाकून ते पाणी प्यायल्याने हँगओव्हर उतरण्यास मदत होते. तसेच याच्या सेवनाने गॅस आणि ऍसिडिटीचाही धोका कमी होतो. 

7/7

(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)