कुशल बद्रिकेने सांगितला प्रेमात पडल्यानंतरचा अनुभव, म्हणाला `गुलाबी गॉगल....`
कुशल बद्रिकेने प्रेमात पडल्यानंतरचा अनुभव कसा असतो, याबद्दल सांगितले आहे. त्याच्या पोस्टवर अभिनेता संतोष जुवेकरने कमेंट केली आहे.
Kushal Badrike Valentine Day Post : विनोदाचा बादशाह, हुकमी एक्का अशी ओळख निर्माण केलेला अभिनेता म्हणून कुशल बद्रिकेला ओळखले जाते. चला हवा येऊ द्या या कार्यक्रमामुळे तो घराघरात पोहोचला. कुशल हा काही दिवसांपूर्वी 'बाप माणूस' या चित्रपटात झळकला. आता कुशलने व्हॅलेंटाईन डे निमित्ताने एक खास पोस्ट शेअर केली आहे. यात त्याने प्रेमात पडल्यानंतरचा अनुभव कसा असतो, याबद्दल सांगितले आहे.
कुशल बद्रिके हा सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतो. नुकतंच कुशलने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्याने त्याची पत्नी सुनयनाचा फोटो पोस्ट केला आहे. या फोटोला कॅप्शन देताना त्याने पत्नी सुनयनाला व्हॅलेंटाईन डेच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्याची ही पोस्ट सध्या चर्चेत आहे.
कुशल बद्रिकेने सांगितला अनुभव
"तुमच्यासोबत झालंय का कधी असं ? की एखादं माणूस आपल्या समोर येतं आणि जगात फक्त आपलंच घड्याळ slow motion मध्ये धावायला लागतं. Newton ने लावलेला गुरुत्वाकर्षणाचा शोध फाट्यावर मारून आपण तरंगूच लागतो एकदम. जत्रेतल्या चष्मेवाल्याकडचा “गुलाबी गॉगल” चढवल्या सारखं फक्त आपलंच जग “गुलाबी” होऊन जातं आणि “जत्रेतला पाळणा” अजूनही slow motion मध्ये धावत आपल्या घड्याळात अडकून पडलेला असतो, बास बास तुमचा व्यवहारी जगाशी संबंध संपला, राजाहो तुम्ही प्रेमात आहात, आता slow, motion मधलं “जत्रेतलं घड्याळ” आणि तुमच्या “मनगटावरचा पाळणा” normal ला आणायची चावी समोरच्या माणसाकडे आहे. देव तुमचं भलं करो :- सुकून, happy valentine’s Day", असे कॅप्शन कुशलने या पोस्टला दिले आहे.
संतोष जुवेकरची कमेंट
कुशल बद्रिकेच्या या पोस्टवर अभिनेता संतोष जुवेकरने कमेंट केली आहे. "प्रेम दिनाच्या प्रेमपूर्वक प्रेमळ खूप खूप प्रेम तुम्हां दोघांनाही", अशी कमेंट संतोषने या पोस्टवर केली आहे. तर काही कलाकारांनी "हॅप्पी व्हॅलेंटाईन डे" असे म्हणत कमेंट केली आहे. कुशलच्या या पोस्टवर कलाकारांसह चाहतेही कमेंट करताना दिसत आहेत. यावर अनेकांनी त्या दोघांनाही व्हॅलेंटाईन डेच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
दरम्यान कुशलची ही पोस्ट सध्या व्हायरल होत आहे. कुशलची पत्नी सुनयना ही उत्तम कथ्थक डान्सर आहे. काही दिवसांपूर्वी ती ‘मुघल-ए-आझम’ या रंगभूमीवरील महानाट्य काम करताना दिसली होती. तिचा नाट्याचा प्रयोग अमेरिकेतही आयोजित करण्यात आला होता. विशेष म्हणजे कुशलने मनोरंजन क्षेत्रात येण्यासाठी प्रचंड मेहनत केली आहे. या सर्व काळात त्याला त्याची पत्नी सुनयना बद्रिकेने खंबीरपणे साथ दिली.