मुंबई : गणपती बाप्पाच्या आगमनाला आठ दिवस झाले. त्यात मुंबईतील गणेशोत्सव म्हणजे काही वेगळीच धम्माल असते. मुंबईतील गणपती पाहायला प्रेक्षक लांबून लांबून येतात. एकदा तरी बाप्पाचे दर्शन घ्यावे अशी त्यांची इच्छा असते. त्यासाठी कितीही गर्दी असली तरी भक्त आपल्याला तिथे पाहायला मिळतात. सगळ्यात जास्त चर्चेत असणार गणपती हा लालबागचा राजा आहे. लालबागच्या राज्याला प्रेक्षक गर्दी करून दर्शन घेतात. लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी दुसऱ्या राज्यातून देखील अनेक लोक येतात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नवसाला पावणाऱ्या लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी  नेहमीच भाविक  आतुर असतात. सामान्य लोकांपासून अगदी सेलिब्रिटीज पर्यंत सगळेच राजाचा  आशीर्वाद घेण्यासाठी आवर्जून त्याच्या दरबारी पोहोचतात.. मग अशातच आपली मनोरंजन सृष्टी तरी मागे कशी राहणार. यंदा सन मराठीच्या मुख्य कलाकारांनी लालबागच्या राजाचे दर्शन घेतले.. या वेळेस सन मराठीच्या कन्यादान या मालिकेतील संग्राम साळवी, माझी माणसं या मालिकेतील सायंकित कामत आणि  जानकी पाठक, प्रेमास रंग यावे या मालिकेतील गौरी कुलकर्णी, अमिता कुळकर्णी रोहित शिवलकर तर संत गजानन शेगवीचे या मालिकेतील अमित फाटक या कलाकारांना बाप्पाची आरती करण्याचं मान ही मिळाला. 


गणेशोत्सवामुळे सर्वत्र आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे, बाप्पाच्या आगमनाच्या तयारीत सर्वजण मग्न झालेले आहेत. प्रत्येकासाठी गणेशोत्सव हा खूप खास असतो, मग ती व्यक्ती लहान असो किंवा वयस्कर, मुलगा असो किंवा मुलगी आनंद तोच असतो.
 
सन मराठी वाहिनी वरील कन्यादान मालिकेतील मुख्य व्यक्तिरेखा साकारणारा अभिनेता  संग्राम साळवी यांनी त्याचे आणि बाप्पाचे खास कनेक्शन शेअर केले. "गणपती बाप्पा आणि गणेशोत्सव हा सण माझ्या खूप जवळचा आहे. त्यात माझे वडील नेव्ही मध्ये असल्यामुळे मी भारतातील वेगवेगळ्या राज्यात राहिलोय आणि आणि वेगवेगळ्या राज्यातील वेगवेगळ्या पद्धतीचे गणपती पूजन मी पाहिले आहे. प्रत्येक राज्यात त्यांच्या त्यांच्या पद्धतीने आणि त्यांच्या विविध भाषांमधील आरत्या मी ऐकले आहेत. त्यामुळे मला गणेशोत्सवाची फार उत्सुकता असते आणि हे दहा दिवस मला खूप जवळचे वाटतात."  


सन टीव्ही नेटवर्कची 'सन मराठी' ही वाहिनी तिच्या मालिकांमधून समाज प्रबोधनाचे कार्य करत असते. समाजात सकारात्मक बदल घडवण्याच्या आणि नवीन विचार मांडण्याच्या उद्देशाने मालिका तयार केल्या जात आहेत. 'सोहळा नात्यांचा' हे ब्रीदवाक्य असणाऱ्या या वाहिनीने प्रेक्षकांना नवीन विचारसरणी देण्याचा प्रयत्न केला आहे.