Sankarshan Karhade Share Village Memories : मराठी मनोरंजनसृष्टीतील एक बहुआयामी कलाकार म्हणून संकर्षण कऱ्हाडेला ओळखले जाते. संकर्षण कऱ्हाडेच्या अभिनयाचे, लिखाणाचे, दिग्दर्शनाचे, कवितांचे लाखो चाहते आहेत. संकर्षण हा उत्तम सूत्रसंचालकही आहे. संकर्षण हा सध्या 'नियम व अटी लागू' या नाटकामुळे चर्चेत आहे. या नाटकाच्या निमित्ताने त्याने गावाकडील एक खास आठवण सांगितली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संकर्षण कऱ्हाडे हा इन्स्टाग्रामवर सक्रीय असतो. तो नेहमी चाहत्यांना त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगत असतो. सध्या संकर्षण हा 'नियम व अटी लागू' या नाटकात व्यस्त आहे. या नाटकाच्या निमित्ताने तो त्याच्या मूळ गावी पोहोचला आहे. यावेळी त्याने त्याच्या गावातील घराची झलकही दाखवली आहे. यावेळी संकर्षणने बालपणीच्या आठवणींनाही उजाळा दिला. 


संकर्षण कऱ्हाडे काय म्हणाला?


"आज अंबेजोगाई मध्ये नाटकाचा प्रयोग आहे. आमचं मूळ गांव अंबेजोगाई. इथे आमचा छोटासा वाडा आहे.. वाड्यात मारुती चं मंदिर.. आज नाटकवाली मंडळी घरी आली.. मग योगेश्वरी देवीचं दर्शन घेतलं .. आणि मग दिवस सरता सरता आद्यकवी मुकुंदराज स्वामी समाधी स्थळी जाउन आलो. फार शांत वाटलं. लहानपणापासून अंबेजोगाईची ओढ आहेच. ऊन्हाळ्याची सुट्टि लागली कि , हनूमान जयंती ला घरच्या मारूतीच्या उत्सवाला यायचं…. सगळं आठवत आठवत आज दिवस छान गेला.. आता रात्री आपल्याच मूळ गावांत आपणच लिहिलेल्या आणि काम करत असलेल्या नाटकाचा प्रयोग करायचा… आनंद वेगळाच", असे संकर्षण कऱ्हाडेने म्हटले. 



संकर्षण कऱ्हाडेच्या या पोस्टवर अनेक चाहते कमेंट करताना दिसत आहेत. यात एकाने आपल्या मूळ गावी आपली कलाकृती सादर करण्यात एक वेगळी मजा आणि आनंद असतो, असे म्हटले आहे. तर एकाने खरच मनाला मिळणारा आनंद निराळा असेल, अशी कमेंट केली आहे. 


आणखी वाचा : 'हे फार धाडसाचे काम...', शरद पोंक्षेंच्या 'त्या' निर्णयावर संकर्षण कऱ्हाडेची प्रतिक्रिया


दरम्यान संकर्षण कऱ्हाडे हा विविध नाटकांच्या प्रयोगात व्यस्त आहे. तो सध्या ‘नियम व अटी लागू’, ‘तू म्हणशील तसं’ आणि ‘संकर्षण Via स्पृहा’ या तीन नाटकात दिसत आहे. त्याच्या या सर्व नाटकांच्या प्रयोगांना प्रेक्षक भरभरून प्रतिसाद देताना दिसत आहेत. तो सोशल मीडियावरही सतत सक्रीय असतो.