Shreyas Talpade health deteriorated : मराठी अभिनेता श्रेयस तळपदे (Shreyas Talpade) याची शुटिंगनंतर अचानक तब्येत ढासळल्याची माहिती समोर आली आहे. हृदयविकाराचा झटका आल्याची प्राथमिक माहिती समोर आली होती. मात्र, अद्याप यावर अधिकृत माहिती समोर आली नाही. श्रेयसला मुंबईतील अंधेरीच्या बेलेव्ह्यू रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 'वेलकम टू द जंगल' या चित्रपटाचं शुटिंग सुरू असताना ही घटना घडली. शूटिंग संपल्यानंतर लगेचच तो बेशुद्ध पडला. त्याने सेटवर अक्षय कुमार देखील उपस्थित होता. त्यानंतर लगेच त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

श्रेयसने दिवसभर शुटिंग पूर्ण केलं, तो पूर्णपणे ठीक होता आणि सेटवर सर्वांशी विनोद करत होता. त्याने थोडेसे अॅक्शन सीक्वेन्सही शूट केले. शूट संपल्यानंतर तो घरी निघाला असताना आणि त्याने पत्नीला सांगितलं की त्याला अस्वस्थ वाटतंय. तिने त्याला हॉस्पिटलमध्ये नेण्याचं ठरवलं पण तो वाटेतच कोसळल्याची माहिती समोर आली आहे.



श्रेयस तळपदे आता बरा असल्याची माहिती श्रेयसच्या टीमकडून देण्यात आली आहे. त्याला मुंबईतील अंधेरी पश्चिम येथील बेलेव्ह्यू रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं श्रेयसच्या सेक्रेटरीने सांगितलं आहे. तर श्रेयसची तब्येत आता व्यवस्थित असून त्याला दोन दिवस आराम करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.


दरम्यान, मल्टीस्टार सिनेमा असलेला वेलकम टू जंगल हा सिनेमा अॅक्शन सीनने खचाखच भरलेला असेल. अक्षय कुमार, श्रेयस तळपदे यांच्यासह रवीना टंडन, दिशा पटानी, जॅकलीन फर्नांडिस, लारा दत्ता, सुनील शेट्टी, संजय दत्त, परेश रावल, अर्शद वारसी, तुषार कपूर,  राजपाल यादव, जॉनी लीव्हर, किकू शारदा, कृष्णा अभिषेक, राहुल देव यांचा अभिनय पहायला मिळणार आहे.