`तुला अक्कल नाहीये, देऊ का एक थोबाडीत`; सिद्धार्थ चांदेकर नेमका कोणावर भडकला? पाहा व्हिडीओ
आता सिद्धार्थ चांदेकरने एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमुळे तो चर्चेत आला आहे.
Siddharth Chandekar Angry On Emoji : मराठी सिनेसृष्टीतील चॉकलेट हिरो अशी ओळख असेलला अभिनेता म्हणून सिद्धार्थ चांदेकरला ओळखले जाते. गेल्या काही महिन्यांपासून सिद्धार्थ चांदेकर हा सातत्याने प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सिद्धार्थ चांदेकरचे झिम्मा, झिम्मा 2, ओले आले हे चित्रपट सुपरहिट ठरले. या चित्रपटामुळे तो खऱ्या अर्थाने प्रसिद्धीझोतात आला. आता सिद्धार्थ चांदेकरने एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमुळे तो चर्चेत आला आहे.
सिद्धार्थ चांदेकर हा सोशल मीडियावर सक्रीय असतो. तो कायमच विविध फोटो आणि मजेशीर व्हिडीओ शेअर करताना दिसतो. आता सिद्धार्थ चांदेकरने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओला कॅप्शन देताना सिद्धार्थने “सगळ्यांचं होतं का माहीत नाही, मला तर लय राग येतो,” असे म्हटले आहे. या व्हिडीओत सिद्धार्थ चांदेकर हा त्याच्या पत्नीने शेअर केलेल्या रीलवर कमेंट करताना दिसत आहे. ही कमेंट करत असताना तो अनेक स्माईल पाठवतो. पण त्यातील एक स्माईली हा खालच्या रांगेत गेला. त्यावरुन त्याने एक मजेशीर व्हिडीओ पोस्ट केला आहे.
पाहा नेमकं काय घडलं?
“तुम्हाला कधी कुठल्या हसणाऱ्या स्माईलीला थोबाडीत मारावीशी वाटली? म्हणजे बघाना, आपल्याला कोणीतरी एक कमाल रील पाठवतं. आपल्या खूप हसू येतं म्हणून आपण उत्साहात अनेक स्माइलीचे इमोजी पाठवतो. पण यावेळी एक स्माईली खालच्या रांगेत जातो. त्यावर सिद्धार्थ आता तुला काय झालं होतं वर त्यांच्याबरोबर राहायला? तुला अक्कल नाहीये? देऊ का एक थोबाडीत?” असे सिद्धार्थ चांदेकर या व्हिडीओत म्हणतो. सिद्धार्थ चांदेकरचा हा मजेशीर व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.
या व्हिडीओवर अनेक कलाकार कमेंट करताना दिसत आहेत. या व्हिडीओवर सिद्धार्थची पत्नी मिताली मयेकरने “ओसीडी प्रो मॅक्स” असे म्हटले आहे. तर अभिनेत्री मृण्मयी देशपांडेने “खरंच? तुला आता हे वाटतंय?” असा प्रश्न त्याने विचारला आहे. तर पूजा पुरंदरेने हसण्याचे इमोजी पोस्ट करत कमेंट केली आहे.
लवकरच झळकणार 'या' चित्रपटात
दरम्यान सिद्धार्थ चांदेकर हा लवकरच 'Congratulations' या चित्रपटात झळकणार आहे. सध्या या चित्रपटाचे शूटींग सुरु आहे. या चित्रपटात कोणकोणते कलाकार असणार, याबद्दलची माहिती अद्याप समोर आलेली नाही. तसेच हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार याबद्दलही कोणतीही माहिती समोर आलेली नाही.