Sayali Sanjeev Tea Lover : 'काहे दिया परदेस' या मालिकेतून प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री म्हणजे सायली संजीव. तिच्या सहज सुंदर अभिनयामुळे तिने अनेकांची मन जिंकली. या मालिकेतील तिच्या भूमिकेला अल्पावधीतच प्रेक्षकांची पसंती मिळाली. सध्या सायली ही 'ओले आले' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. यानिमित्ताने दिलेल्या एका मुलाखतीदरम्यान सिद्धार्थ चांदेकरने सायली संजीवच्या एका सवयीबद्दल खुलासा केला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'ओले आले' हा मराठी चित्रपट 5 जानेवारीला प्रदर्शित झाला. या चित्रपटात सायली संजीव, सिद्धार्थ चांदेकर, नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे हे कलाकार झळकत आहेत. या चित्रपटाला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळताना दिसत आहेत. या निमित्ताने सायली आणि सिद्धार्थने 106.4 या रेडिओ चॅनलला मुलाखत दिली. यावेळी सायली आणि सिद्धार्थ एकमेकांच्या विविध सवयींबद्दल खुलासा केला. 
आणखी वाचा : 'तुला अजून चांगली भेटली असती...', पत्नीबद्दलची 'ती' कमेंट वाचताच सिद्धार्थ चांदेकर भडकला; म्हणाला- 'एखाद्या मुलीची गरज...'


"सायली प्रचंड चहाप्रेमी"


या मुलाखतीवेळी सायलीला 'तुला चहा प्यायला आवडतो की कॉफी?' असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना सिद्धार्थने सायली संजीव ही प्रचंड चहाप्रेमी असल्याचे सांगितले आहे. "ती दिवसातून 93 कप चहा पिऊ शकते", असेही त्याने म्हटले. 


"मला लोक ओरडतात, पण..."


"सायली ही दिवसातून 93 कप चहा पिऊ शकते. सायली संजीव ही चहा प्रेमी आहे. ती सतत चहा पित असते. मला कधी कधी वाटतं की तिच्या तोंडातून आता बागा बाहेर येतील", असे सिद्धार्थ चांदेकर मुलाखतीदरम्यान म्हणाला. त्यावर सायलीने "मला चहा खूप आवडतो. यावरुन मला अनेकदा लोक ओरडतात, पण दुसऱ्या क्षणाला तेच लोक माझ्यासाठी चहाची ऑर्डर करतात", असे गंमतीत म्हटले.



आणखी वाचा : 'ब्रा न घालता...', मिताली मयेकरची 'ती' पोस्ट चर्चेत, म्हणाली 'महिलांनो...'


दरम्यान सायली संजीवने आतापर्यंत मालिका आणि चित्रपटात काम केले आहे. 'काहे दिया परदेस' या मालिकेद्वारे तिने सिनेसृष्टीत पदार्पण केले. यानंतर ती 'परफेक्ट पती', 'शुभमंगल ऑनलाईन' या मालिकांमध्ये झळकली. त्याबरोबरच सायली ही 'बस्ता', 'गोष्ट एका पैठणीची', 'हर हर महादेव', 'फुलराणी', 'उर्मी' या चित्रपटात झळकली. त्यानंतर 'झिम्मा', 'झिम्मा 2' या चित्रपटातील तिच्या भूमिकेचे प्रचंड कौतुक झाले. आता सध्या ती 'ओले आले' या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.