'तुला अजून चांगली भेटली असती...', पत्नीबद्दलची 'ती' कमेंट वाचताच सिद्धार्थ चांदेकर भडकला; म्हणाला- 'एखाद्या मुलीची गरज...'

Siddharth Chandekar Angry : एका नेटकऱ्याने सिद्धार्थ चांदेकरला मिताली मयेकरशी लग्न करण्यावरुन टोला लगावला आहे. त्यावर त्याने स्पष्ट शब्दात उत्तर दिले आहे. यावरुन त्याला अनेक चाहते पाठिंबा देताना दिसत आहेत. 

Updated: Jan 4, 2024, 06:44 PM IST
'तुला अजून चांगली भेटली असती...', पत्नीबद्दलची 'ती' कमेंट वाचताच सिद्धार्थ चांदेकर भडकला; म्हणाला- 'एखाद्या मुलीची गरज...' title=

Siddharth Chandekar Angry : मराठमोळा अभिनेता सिद्धार्थ चांदेकर हा गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहे. सिद्धार्थ हा लवकरच ओले आले या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सिद्धार्थ हा सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतो. तो अनेकदा ट्रोलर्सला जशाच तसे उत्तर देताना दिसतो. नुकतंच सिद्धार्थने एका नेटकऱ्याला सडेतोड उत्तर दिले आहे. 

सिद्धार्थ चांदेकर आणि अभिनेत्री मिताली मयेकर हे दोघेही मराठी कलाविश्वातील लोकप्रिय जोडपं म्हणून ओळखले जाते. सिद्धार्थ चांदेकर-मिताली मयेकरने २०२१ मध्ये लग्नगाठ बांधली. गेली अनेक वर्ष ते एकमेकांना डेट करत आहेत. सिद्धार्थ आणि मितालीने नुकतंच एक जाहिरात केली आहे. त्याचा एक व्हिडीओ त्यांनी पोस्ट केला आहे. 

या व्हिडीओवर अनेक नेटकरी विविध कमेंट करताना दिसत आहेत. मात्र एका नेटकऱ्याने सिद्धार्थ आणि मितालीला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला आहे. त्याने सिद्धार्थला मितालीशी लग्न करण्यावरुन टोला लगावला आहे. त्यावर त्याने स्पष्ट शब्दात उत्तर दिले आहे. 

"तू लग्न करुन गंडलास... तुला अजून छान भेटली असती", अशी कमेंट त्या नेटकऱ्याने सिद्धार्थच्या व्हिडीओवर केली आहे. त्यावर उत्तर देताना सिद्धार्थ म्हणाला, "मुलीचे आई वडील सेम म्हणाले तुझ्याबद्दल." त्यावर त्या नेटकऱ्याने पुन्हा एक कमेंट केली आहे. "वाईट नको मानूस पण... माझ्यासारखी काही माणसं गोंधळलेल्या पत्नीपेक्षा स्वालंबी मुलीची पत्नी म्हणून निवड करतात. तुला शुभेच्छा. पण मला जे मनातून वाटलं ते मी बोललो", अशी प्रतिक्रिया त्या नेटकऱ्याने दिली आहे. 

त्यावर सिद्धार्थने पुन्हा कमेंट करत त्याला चांगलेच खडसावले आहे. "अरे, मी सहमत आहे की तुला पण एखाद्या मुलीची गरज आहे. पण इतर स्त्रियांबद्दल तुझे असलेले मत पाहून तू निश्चितरित्या यासाठी पात्र नाहीस", अशी कमेंट सिद्धार्थने केली आहे. 

Siddharth Chandekar Angry

दरम्यान सिद्धार्थच्या या कमेंटवर अनेक चाहते त्याला पाठिंबा देताना दिसत आहे. अनेकांनी ट्रोल करणाऱ्या त्या नेटकऱ्याला चांगलेच खडसावले आहे. सध्या सिद्धार्थ हा त्याच्या चित्रपटामुळे चांगलाच प्रसिद्धीझोतात आहे. काही दिवसांपूर्वी सिद्धार्थची प्रमुख भूमिका असलेला 'झिम्मा २' हा चित्रपट चांगलाच गाजला होता. आता लवकरच तो 'ओले आले' या चित्रपटात झळकणार आहे. यात त्याच्याबरोबर नाना पाटेकर, सायली संजीव हे दोघेही स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत.