Sumeet Pusavale Exit Balumamachya Navan Changbhala : कलर्स मराठी वाहिनीवरील लोकप्रिय कार्यक्रम म्हणून 'बाळूमामाच्या नावानं चांगभलं' या मालिकेला ओळखले जाते. गेल्या पाच वर्षांपासून या मालिकेला महाराष्ट्रातून भरभरुन प्रेम मिळत आहे. या मालिकेत बाळूमामांची भूमिका अभिनेता सुमीत पुसावळेने साकारली आहे. या भूमिकेमुळे तो घराघरात पोहोचला. याच मालिकेमुळे त्याला एक वेगळी ओळख मिळाली. पण या मालिकेच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. अभिनेता सुमीत पुसावळेने ‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ या मालिकेतून एक्झिट घेतली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुमीत पुसावळेने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टद्वारे त्याने त्याच्या चाहत्यांना ‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ मालिकेतून बाळूमामांच्या भूमिकेतून एक्झिट घेत असल्याचे सांगितले आहे. यासोबतच त्याने एक भावूक पोस्टही शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने सर्व चाहत्यांसह कलाकारांचेही आभार मानले आहेत. 


सुमीत पुसावळेची भावूक पोस्ट


बाळूमामाच्या नावानं चांगभलं...  नमस्कार, मी सुमित पुसावळे, खरं तर ही ओळख “बाळुमामा” ह्या नावा व्यतिरिक्त लगेच नाही होत आणि त्याच कारण तर तुम्हाला माहिती आहेच. बोलण्यासारखं, लिहण्यासारख खुप काही आहे. आजही बाळुमामाच्या नावानं चांगभलं सिरीयल च्या सेटवरचा योगायोगाने गेलो होतो तो दिवस आठवतोय, योगायोगाने आणि पुढच्या काही दिवसातच बाळूमामांच्या रोल साठी बोलावण आल आणि माझ्या आयुष्यात नवीन पर्व सुरु झालं. बाळूमामांच्या सेवेत रुजू झालो.


सगळ्यातआधी ह्या मालिकेचे निर्माते श्री. संतोष अयाचित सर यांचे मनापासून आभार. मला, सुमित पुसावळेला एक वेगळी ओळख दिली, ही ओळख आयुष्यभरासाठी राहील अस काम माझ्याकडून करून घेतलंत. निखिल साने सर, दीपक राजध्यक्ष सर, विराज राजे सर, केदार शिंदे सर. तसच स्नेहल, गायत्री, अली भाई साई सर, प्रज्ञा, कलर्स मराठी प्रोमो टीम राहुल सर, गणेश सर आणि इतर सर्व कलर्स मराठी टीम यांचे मनापासून आभार, वेळोवेळी माझ्या कामाच्या कौतुक करून मला प्रोत्साहन दिल. मालिकेचे दिग्दर्शक केदार सर, D.O.P. रुपेश सर, आशिष भाई, माझा उत्तम मेकअप करणारे राजेश दादा आणि त्याची संपूर्ण टीम, संकेत, प्रसाद, विकी, मयूर, शुभम, रोहन दा, मला बाळुमामाच्या रूपात आणण्यासाठी आमची वेशभूषा टीम, राजेश, पिनाकी दादा, राजेश, सतीश, उपेंदर, संतोष दादा. सेटिंग टीम मारुती दादा, बाबा दादा, संतोष दादा, सावंत मामा. लाईट टीम दया भाई, पांडेजी, अनिस भाई, महेंदर भाई, आणि इतर टीम मेंबर, ट्रॉली टीम सतीश, कॅमेरा टीम सुभाष, गुड्डू भैय्या, अख्खी डायरेकशन टीम, प्राची मॅडम. संपूर्ण प्रोडक्शन टीम, ओंकार,प्रवीण, संदीप, सुमित, प्रेम, विशाल सर, लोकेश दादा. एडिट टीम चे गणेश दादा आणि त्यांची संपूर्ण टीम, स्पॉट टीम जय, अरविंद, रघु, किसना, अनिरुद्ध, सनी. आणि माझ्या सोबतचे हजारो कलाकार तुम्हा सर्वांचे मनापासून आभार 


मायबाप प्रेक्षकांनो तुम्ही केलेल्या सहकार्याबद्दल खुप खुप आभार. आजवर मला बाळुमामा म्हणून खुप प्रेम दिलत, खुप साथ दिलीत, मला त्या रोल मध्ये स्वीकारल, माझ्यावर विश्वास ठेवलात अशीच साथ तुम्ही यापुढे ही द्या, असाच विश्वास माझ्यावर ठेवा, आणि असच प्रेम माझ्यावर अन माझ्या कामावर करा. लवकरच भेटूयात. जाता जाता एवढंच म्हणेन, बोला बोला बाळूमामाच्या नावानं चांगभलं, असे सुमीत पुसावळेने म्हटलं आहे. 



दरम्यान बाळूमामाच्या नावानं चांगभलं या मालिकेचा पहिला एपिसोड 13 ऑगस्ट 2018 रोजी प्रदर्शित झाला. या मालिकेची कथा संतोष अयाचित यांनी लिहिली आहे. तर निशांत विलास सुर्वे यांनी या मालिकेचे दिग्दर्शन केले आहे.  या मालिकेत बाळूमामांची भूमिका अभिनेता सुमीत पुसावळे साकारत होता. पण नुकतंच त्याने यातून एक्झिट घेतली आहे. त्यामुळे आता या मालिकेत पुढे काय होणार, याबद्दल औत्सुकता पाहायला मिळत आहे. तसेच सुमीतने मालिका सोडल्यावर या भूमिकेसाठी कोणाची वर्णी लागणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.