Swapnil Joshi Trolled : मराठी अभिनेता स्वप्निल जोशी सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतो. नेहमी तो सोशल मीडियावर पोस्टही शेअर करत असतो. आपल्या अभिनयाने मराठी चित्रपटसृष्टीत स्वतःच वेगळं स्थान निर्माण केलं आहे. नुकताच स्वप्नील 'वाळवी' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आला. त्याचा हा चित्रपटही प्रेक्षकांची वाहवा मिळवतोय. मात्र त्यापूर्वी असं काहीतरी घडलंय ज्यामुळे स्वप्नील सोशल मीडियावर ट्रोल झालाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चॉकलेट बॉय असणारा स्वप्नीलच्या हातून घडलेल्या छोट्या छोट्या चुकांमुळे तो नेटकऱ्यांच्या ट्रोलिंगला बळी पडला आहे. स्वप्नीलने नुकत्याच 'वेड' चित्रपटाला शुभेच्छा दिल्या होत्या. मात्र त्याला हे ट्वीट करणं महागात पडलं आहे. नेमकं स्वप्निलने काय ट्वीट केलं ज्यामुळे त्याला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. पाहूयात


स्वप्निल जोशीचं ट्वीट
स्वप्निलनं ट्वीटमध्ये लिहिलं, ''वेड'' आज BO वर ५० कोटीचा गल्ला पार करेल ! केवळ क. मा. ल.  कामगिरी ! मराठी पाउल पाढते पुढे! मनापासून अभिनंदन @Riteishd भाऊ, @geneliad
वैनी आणि पूर्ण टीम!


नेटकऱ्यांनी केलं ट्रोल 
स्वप्निलच्या ट्वीटला एका नेटकऱ्यानं रिप्लाय केला, अरे कसली भाषा तुमची.. वहिनी, असं असतं ते.. म्हणे मी पुण्याचा..' तर दुसऱ्या युझरनं कमेंट करत म्हटलंय की, 'जिनिलिया वहिनी नॉट वैनी रे, म्हणून मराठीत बोला ,आणि मराठी SRKहे  बालिश ढोंग करू नका,' 'मराठी व्यवस्थित लिहा जोशी आधी, पाढते? वैनी? पाउल?' अशी कमेंट देखील एका नेटकऱ्यानं केली. स्वप्निलच्या या ट्वीटमधील पाउल , पाढते  आणि वैनी या शब्दांनी नेटकऱ्यांचे लक्ष वेधलं. 



नुकताच स्वप्निल जोशीचा 'वाळवी' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. वेड सिनेमानंतर वाळवी हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालताना दिसत आहे.  या सिनेमात स्वप्नील जोशी, सुबोध भावे, अनिता दाते आणि शिवानी सुर्वे' यांच्या प्रमुख भूमिका आहेत. त्यानी चांगला अभिनय साकारला आहे. सिनेमाच्या उत्तम कथेमुळे आणि मांडणीमुळे प्रेक्षकांच्या पसंतीला हा सिनेमा उतरत आहे.