Zee Marathi New Serial : 'तुझ्यात जीव रंगला' फेम अक्षया देवधर पुन्हा एकादा झी मराठीवरील या मालिकेतून पुनरागमन करणार आहे. अभिनेत्रीने झी मराठी पुरस्कार सोहळ्यादरम्यान एका नवीन मालिकेची घोषणा केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

झी मराठीवर 'लक्ष्मी निवास' ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेचा टीझर प्रदर्शित होताच चाहत्यांमध्ये चर्चांना उधाण आले आहे. सगळीकडे या मालिकेची चर्चा सुरु झाली आहे. त्यानंतर सगळ्या प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. तर या मालिकेतील हर्षदा खानविलकर, तुषार दळवी हे दोन दिग्गज कलाकार दिसण्याची शक्यता आहे. 


मालिकेचा दुसरा टीझर प्रदर्शित


आता याच मालिकेचा दुसरा टीझर प्रदर्शित झाला आहे. ज्यामध्ये हर्षदा खानविलकर, तुषार दळवी या कलाकारांवर शिक्कामोर्तब झालं असून, यांच्या सोबतच अजून एक ओळखीचा चेहेरा या मालिकेत दिसतोय, तो म्हणजे आपल्या सर्वांच्या लाडक्या 'तुझ्यात जीव रंगला फेम' पाठकबाई अर्थात अक्षया देवधरचा. यासोबतच या मालिकेत अजून एक चेहेरा प्रेक्षकांसमोर आल्यामुळे मालिकेबद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे. 
 
लक्ष्मी निवास मालिकेची कथा 


'लक्ष्मी निवास' ही कथा आहे. स्वतःचं घर बांधण्याचं स्वप्न बघणाऱ्या एका मध्यमवर्गीय जोडप्याची. लक्ष्मी एका श्रीमंत घरात वाढलेली मुलगी. श्रीनिवासवर असलेल्या अतोनात प्रेमामुळे तिनं त्याच्याशी पळून जाऊन लग्न केलं आणि माहेरशी असलेले सगळे संबंध तिला तोडावे लागले. श्रीनिवासकडे स्वतःच्या हक्काचं घर नाही यावरुन झालेला अपमान असह्य झाल्याने तिने स्वतःचं घर होईपर्यंत माहेरी पाऊल न ठेवण्याचा निर्णय घेतला. 



लक्ष्मी आणि श्रीनिवासचा संसार उत्तम फुलला. 3 मुलं, 3 मुली आणि श्रीनिवासची आई इतकं मोठं कुटुंब झालं. आता दोन मुलींची लग्न बाकी आहेत. लक्ष्मी आणि श्रीनिवास समोर अनेक आव्हानं आहेत. एवढ्या मोठ्या कुटुंबाचा महिन्याचा खर्च, पत्रिकेत दोष असलेल्या मुलीचं लग्न जुळवणं, मुली योग्य घरी पडतायेत ना याची काळजी असणं. घरातल्या वेगवेगळ्या स्वभावाच्या माणसांची मोट बांधून त्यांना एकत्र धरुन ठेवणं अशा एक ना अनेक आव्हानांचा सामना या जोडप्याला करावा लागत आहे. 


कुटुंबासाठी झटताना स्वतःच्या इच्छा मागे सारत लक्ष्मी आणि श्रीनिवासला आपल्या स्वतःच्या घराचं स्वप्न साकारायचं आहे. या मालिकेचं लेखन करत आहे सायली केदार, तर मालिकेचे निर्माते आहेत सोमिल क्रिएशन सुनील भोसले. अनेक आव्हानांचा सामना करत कुटुंबाची मोट बांधुन ठेवणाऱ्या जोडप्याची गोष्ट. प्रत्येक मध्यमवर्गीयाला आपलीशी वाटेल अशी खरी गोष्ट! 'लक्ष्मी निवास' लवकरच फक्त आपल्या झी मराठीवर.