महिला दिनानिमित्त अश्विनी भावेंचा अनोखा उपक्रम...
जागतिक महिला दिनानिमित्त, मराठी चित्रपटसृष्टीतील प्रतिभावान अभिनेत्री अश्विनी भावे यांनी अशी एक गोष्ट केली.
मुंबई : जागतिक महिला दिनानिमित्त, मराठी चित्रपटसृष्टीतील प्रतिभावान अभिनेत्री अश्विनी भावे यांनी अशी एक गोष्ट केली, ज्यामुळे आपल्याला त्यांच निश्चितच कौतुक वाटेल.
निसर्ग प्रेमी अश्विनी
अश्विनी भावे या निसर्ग प्रेमी आहेत, ज्यांना विविध प्रकारची रोपं लावण्याची, किचन गार्डनिंग करण्याची आवड आहे. त्या म्हणाल्या, " मनापासून घेतलेल्या कष्टाचं चीज झालं की आपल्याला खरा आनंद होतो आणि समाधान मिळतं. भाजीपाला लावून, त्याची लहान बाळाप्रमाणे निगा राखून, जेव्हा ती बहरतात, ते बघण्यात काही औरच मजा असते.”
#द ग्रीन डोर
अश्विनी भावे यांनी अलीकडेच "#द ग्रीन डोर" कॅम्पेन सुरु केलं, ज्यात त्या वेळोवेळी किचन गार्डेनिंगवर आधारित व्हिडिओ ब्लॉग्स पोस्ट करतात. ह्या हॅशटॅग ला व त्यांच्या व्हिडिओ ब्लॉग्सना सोशल मीडीयावर चांगलाच प्रतिसाद मिळत आहे.
त्यांची गार्डनिंगची आवड आणि इतर महिला कलाकारांबद्दल त्यांना वाटणारी आपुलकी, यांची सुंदर सांगड त्यांनी महिला दिनाच्या निमित्ताने साधली.
भेट दिली रोपटी
अश्विनींने काही मराठी महिला कलाकारांना 'व्हाईट पीस लिली' व 'पुदिन्याची' रोपटे भेट म्हणून दिली. सोबत एक सुंदर हस्तलिखित पत्र होतं ज्यात त्यांनी असं लिहिलं होत की त्यांनी दिलेल्या दोन रोपट्यांपैकी एक रोपटे त्यांचा आदर्श असलेल्या एका महिलेला भेट म्हणून द्यावे अशी गोड विनंतीही केली. ही खरोखरच एक उल्लेखनीय बाब आहे.
याबद्दल अश्विनी म्हणतात...
अश्विनी म्हणतात, " कोणाला भेट म्हणून मला कोणत्याही प्रकाराचं रोपटं देणं कधीही जास्त आवडतं. ज्याप्रमाणे कोणतही रोपटं वाढवण्यासाठी त्याला योग्य ती काळजी व पोषण द्यावं लागतं त्याच प्रमाणे एखाद्या स्त्रीला सक्षम, निर्भय व स्वावलंबी बनवण्यासाठी योग्य तेवढं प्रेम आणि घरच्यांचं प्रोत्साहन मिळावं लागतं. सर्व कष्टकरू स्त्रियांना माझा सलाम."
कणखर अश्विनी
अश्विनी पडद्यावर जरी सोशीक स्त्रीची भूमिका साकारत असल्या, तरी खऱ्या आयुष्यात त्या फार धाडसी आहेत. महिला सशक्तीकरणा विषयी प्रांजळपणे मतं मांडताना त्यांना अजिताब कसलीही भिती बागळत नाहीत.