तुमच्या बाजूला हिंदूही नकोत असं ठरवलं आहे का? केतकी चितळे शिंदे सरकारवर संतापली; `तुम्ही दळिद्रीपणा...`
राज्य सरकारने वक्फ बोर्डाला (Waqf Board) 10 कोटींचा निधी जाहीर केला आहे. यावरुन मराठी अभिनेत्री केतकी चितळे (Ketaki Chitale) संतापली असून, व्हिडीओ शेअर आपला हा संताप व्यक्त केला आहे. तुम्ही हिंदूही नकोत असं ठरवलं आहे का? अशी विचारणा केतकी चितळेने केली आहे.
राज्य सरकारने वक्फ बोर्डाला (Waqf Board) 10 कोटींचा निधी जाहीर केला आहे. यावरुन मराठी अभिनेत्री केतकी चितळे (Ketaki Chitale) संतापली असून, व्हिडीओ शेअर आपला हा संताप व्यक्त केला आहे. तुम्ही दळिद्रीपणा करणार आहात का? तुम्ही हिंदूही नकोत असं ठरवलं आहे का? असे अनेक प्रश्न केतकी चितळेने विचारले आहेत. महात्मा फुले, स्वातंत्र्यवीर सावकर, बाबासाहेब आंबेडकर यांचं नावं घेऊ नका. त्यांचा महाराष्ट्र असं म्हणत अपमान करु नका. त्यांनी तुमच्याप्रमाणे कृत्य केलेलं नाही असंही ती म्हणाली आहे.
"इतकी धक्कादायक बातमी वाचून उठली आहे की काय बोलावं कळत नाही आहे. ज्या लोकांनी तुम्हाला मतही दिलं नाही त्याचं बळकटीकरण करण्यासाठी तुम्ही 10 कोटी रुपये देत आहात. तुम्ही बधीर आहात की आम्हाला बधीर करुन सोडणार आहात. मी नेहमी म्हणत होते की, लोकसभा निवडणुकीत कोणाला मत द्यायचं हे ठरलं आहे. कारण मला माझा पंतप्रधान कोण हवा आहे हे पाहून मत दिलं होतं. पण विधानसभेत कोणता झेंडा घेऊ हाती हा प्रश्न पडणार आहे. हे मी पूर्वीपासून बोलत होते. पण आता तर तुम्ही माझं मत ठाम करुन सोडलं आहे. वक्फ बोर्डाला रद्द करा यासाठी मोर्चे निघत आहेत आमि तुम्ही त्यांना 10 कोटी रुपये मंजूर करत आहात. आधीच तीन तिघाडी सरकार आहे तुमचं. तुमच्या बाजूला हिंदूही नकोत असं ठरवलं आहे का? तुमचं म्हणणं काय आहे?," अशी विचारणा केतकी चितळेने केली आहे.
"एकजण परत आपल्या काकांकडे जाऊन काका माझं चुकलं, मला माफ कर. मला परत घे असं म्हणणार आहे का? दुसरी व्यक्ती तीनचाकी सायकल चालवता येत नाही, डोक्यात हवा गेली आहे म्हणून परत मी तीनचाकी रिक्षा चालवायला निघतो असं म्हणणार आहे आणि तिसऱ्याचं काय राजीनामाच स्विकारला जात नाही. म्हणून यापद्दतीने तुम्ही दळिद्रीपणा करणार आहात का? दहावीतला मुलगा जसं मी आता नापासच होऊन दाखवतो असं म्हणतो, त्याप्रमाणे तुम्हाला तुमची मतं कमी करण्याचं ठरवलं आहे का? विधानसभेसाठी हेच तुमचं लक्ष्य आहे का? तुमचं म्हणणं नेमकं काय आहे ते स्पष्ट सांगा," असा संताप केतकी चितलेने व्यक्त केला आहे.
पुढे ती म्हणाली आहे की, "वक्फ बोर्डाला बळकटीसाठी पैसा देतोय म्हणजे काय? वक्फ बोर्डाने आतापर्यंत हिंदूंची इतकी जमीन बळकावली आहे. उद्या जर वक्फ बोर्डमधील माणसं आपल्याकडे येऊन ही जमीन आमची आहे असं म्हणाली तर बोंबा मारत रस्त्यावर फिरु. हिंदूंची कितीतरी कोटी एकर जागा हडपल्या आहेत. सर्वाधिक जमीन असणारे ते दुसऱ्या क्रमांकाचे आहेत. आणि तुम्ही त्यांना 10 कोटी देत आहात. अरे निर्लज्ज माणसांनो, थोडी तरी बाळगा. संघाला तोडलंत, सनातनींना तोडताय".
"मी नोटाला आयुष्यभर शिव्या घातल्या आहेत. पण तीन तिघाडी सरकारचे आभार, तुमच्यामुळे विधानसभेत नक्की नोटाचं बटण दाबेन. असंच सुरु राहिलं तर बंगालसारखी स्थिती महाराष्ट्रात होण्यास फार वेळ लागणार नाही. तिकडे दीदी बांगलादेशींना बोलवत आहेत, तुम्ही इकडे रोहिंग्याना जागा द्याल. मानखुर्द तर आधीच बांगलादेशींनी भरलं आहे. तुम्ही रोहिंग्यांना आणून आमच्यावर डोक्यावर बसवा. तुम्ही मुस्लिम राष्ट्र म्हणून घोषित करुनच टाका. छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र कशाला म्हणता. औरंगजेबाचा महाराष्ट्र करायचा असेल तर करुन टाका. कोणाची वाट पाहत आहात?," असा संतप्त सवालही केतकीने विचारला आहे.