Kranti Redkar Praying For Fan Marriage : मराठी सिनेसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री म्हणून क्रांती रेडकरला ओळखले जाते. राजकारण असो किंवा मनोरंजनसृष्टी ती कायमच तिचे मत स्पष्टपणे मांडत असते. क्रांती ही तिच्या रीलमुळे कायमच चर्चेत असते. आता क्रांतीने खास मित्रासोबत लग्न करण्याचे तोटे सांगितले आहेत. त्यावर एका चाहत्याने विचारलेल्या प्रश्नालाही तिने उत्तर दिले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

‘कोंबडी पळाली’ या गाण्यामुळे क्रांती रेडकर ही प्रसिद्धीझोतात आली. ती सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. ती नेहमी विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते. क्रांती ही तिच्या मुलींसोबत अनेक रील्सही शेअर करत असते. आता क्रांतीने इन्स्टाग्रामवर एक रील शेअर केला आहे. 


क्रांती रेडकरचा व्हिडीओ


या व्हिडीओला कॅप्शन देताना क्रांती रेडकरने "आपल्या खास मित्रासोबत लग्न करण्याचे तोटे... खोटं तरी सांगावं" असे म्हटले आहे. या व्हिडीओच्या सुरुवातीला क्रांती म्हणते की, "आपण जेव्हा आपल्या नवऱ्याला विचारतो, बघा हो मी बारीक झालेय का?" तेव्हा ज्यांना अनुभव नसतो असे नवरे असतात ते म्हणतात, बारक झाली आहेस का? असं वाटत नाही. नापास, त्यानंतर अनुभवी नवरे असतात, ते म्हणतात हो गं अगदी बारीक झाली आहेस. छान बारीक झाली आहेस, मस्त. अजून थोडी होऊ शकते. पण जेव्हा तुम्ही तुमच्या मित्राशी लग्न करता तेव्हा त्याची प्रतिक्रिया काहीशी अशी असते, काय बारीक झालीस तू, सुकून काटा झाली आहेस, तू उभी आहेस का, मला दिसलीस नाही? गायब होशील हा, असे म्हणते. मित्राशी लग्न केलं की या समस्या होतात, हा माझा अनुभव आहे." 



क्रांती रेडकरच्या या पोस्टवर एका नेटकऱ्याने कमेंट केली आहे. या पोस्टवर एकाने लग्नाचा विचार सुरूय पण पोरगीचं भेटेना क्रांती दिदी बघ एखादी मुंबईत आहे का? मी रोज अनुभव कथन करायला सकाळी सकाळी तुला फोन करीन, अशी कमेंट केली आहे. त्यावर क्रांतीने हटके प्रतिक्रिया दिली आहे.



"मिळेल मिळेल... छान, सुंदर, सुशील..तुझी बहिण तुझ्यासाठी प्रार्थना करतेय", असे क्रांती रेडकरने म्हटले आहे. तर काहींनी क्रांतीच्या या व्हिडीओप्रमाणे त्यांनाही अनुभव आल्याचे म्हटले आहे. सध्या क्रांती रेडकरचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.