Manasi Naik Divorce From husband : आपल्या उत्तम नृत्यशैलीमुळे प्रेक्षकांच्या नजरा खिळवून ठेवणारी अभिनेत्री म्हणून मानसी नाईकला ओळखले जाते. ‘बाई वाड्यावर या’, ‘वाट बघतोय रिक्षावाला’ यांसारख्या गाण्यांमधून तिने चाहत्यांना वेड लावलं. एक उत्कृष्ट अभिनेत्री म्हणून ती सतत प्रसिद्धीझोतात असते. गेल्या वर्षभरापासून मानसी नाईक ही तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. आता मानसी नाईक कायदेशीररित्या तिचा पती प्रदीप खरेरापासून विभक्त झाली आहे. तिने स्वत: याबद्दल पोस्ट करत माहिती दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मानसी नाईक ही सोशल मीडियावर सक्रीय असते. ती इन्स्टाग्रामवर विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते. आता मानसीने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात तिने  पॅरिसमधील जगप्रसिद्ध आयफेल टॉवरसमोर उभे राहून काही फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोला कॅप्शन देताना तिने ही घोषणा केली आहे.


मानसी नाईकची पोस्ट


"अखेर मी माझ्या भूतकाळापासून मुक्त झाले. प्रत्येकवेळी पुढे टाकलेल्या पावलांमुळे मला स्वतःची ताकद समजली. मी आता जुन्याचा निरोप घेतला आहे आणि नवीन शक्यतांचा स्वीकार करत आहे. आपले आयुष्य फार लहान आहे. त्यामुळे मी भूतकाळाचा विचार न करता वर्तमान आणि भविष्यकाळासाठी जगण्याचं ठरवलं आहे. या प्रवासात माझ्या पाठीशी उभे राहिलेल्या सर्वांचे आभार. एक नवीन सुरुवात", असे कॅप्शन मानसीने या पोस्टला दिले आहे. 


त्यासोबतच मानसीने नवीन सुरुवात, घटस्फोटानंतरचा प्रवास, अखेर सर्व संपलं, मी आनंदी, नवीन मी, धन्यवाद असे अनेक हॅशटॅगही दिले आहेत. तिच्या या पोस्टवर अनेक कलाकार लाईक्स आणि कमेंटसचा वर्षाव करताना दिसत आहेत. अभिनेता सुबोध भावे, आदिनाथ कोठारे या कलाकारांनी तिची पोस्ट लाईक केली आहे. तर अभिनेत्री श्वेता राजनने या पोस्टवर कमेंट केली आहे.



दरम्यान मानसी नाईक आणि प्रदीप खरेरा यांचं लग्न 19 जानेवारी 2021 ला झालं होतं. त्याआधी काही काळ ते दोघंही एकमेकांसह रिलेशनशिपमध्ये होते. मानसी आणि प्रदिप सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असायचे. ते एकमेकांबरोबरचे रोमँटिक फोटो शेअर करताना दिसत होते. पण त्यानंतर त्या दोघांनीही इन्स्टाग्रामवरून एकमेकांबरोबरचे फोटो डिलीट केले. यानंतर त्या दोघांच्या नात्यात दुरावा आल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. त्यानंतर मानसीने एका मुलाखतीत तिने घटस्फोटाबद्दलची माहिती दिली होती.