Mitali Mayekar Instagram : सोशल मीडियावर (social media) उपलब्ध असणाऱ्या अनेक गोष्टींमुळं आपल्या आवडत्या कलाकारांच्या जीवनात नेमकं काय सुरुये याचा अंदाज आपल्याला येतो. किंबहुना या माध्यमामुळं चाहते आणि कलाकारांमध्ये असणारी दरी दूर झाली आहे. पण, याची दुसरी बाजूही नाकारता येत नाही. जी बऱ्याच अंशी मनस्ताप देणारी आहे. सोशल मीडिया ट्रोलिंग हासुद्धा त्याचाच एक प्रकार. त्याहीपलीकडे जाऊन अर्थाचा अनर्थ करत होणाऱ्या चर्चांकडेही दुर्लक्ष करता येणार नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सेलिब्रिटींच्या इन्स्टा पोस्ट हल्ली माध्यमांसाठीही जिव्हाळ्याचा विषय. पण, हे सर्व करत असताना अनेकदा परिस्थितीचा अंदाज न घेताच 'बातमी' देण्याची घाई करत काही मंडळी पुढे जातात आणि इथं सेलिब्रिटींचा पारा चढतो. अभिनेत्री मिताली मयेकरनं सध्या याच कारणामुळं लक्ष वेधलं. 


इन्स्टाग्रामवर तिनं काळ्या रंगाच्या गाऊनमधील एक फोटो पोस्ट करत त्यावर 'Mommy’s gettin hot' असं कॅप्शनही दिलं. तिच्या या फोटोला असंख्य लाईक्स आले. पण, त्याहूनही फोटोवर येणाऱ्या कमेंट्सचा आकडा मोठा होता. कमेंट्समध्ये चाहत्यांनी ती गरोदर आहे का? असे प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. काहींनी तर तिला शुभेच्छाही दिल्या. इथपर्यंत सर्वकाही ठीक होतं. पण, काही माध्यमांनी तिच्या गरोदरपणाचं वृत्तही प्रसिद्ध केलं आणि इथं मितालीचा संताप अनावर झाला. 


हेसुद्धा वाचा : 'लडकी चाहीये?' गोव्यात दलालांचा सुळसुळाट, भर रस्त्यातच प्रश्न विचारतात आणि...


आपल्याविषयी होणाऱ्या चर्चा, सोशल मीडियावर येणारे प्रश्न हे सर्वकाही पाहता अखेर इन्स्टाग्रामवरूनच तिनं आपण गरोदर नसल्याचं स्पष्ट करत, तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. किंबहुना आपल्याला ते गाणं आवडल्यामुळं कॅप्शनला ठेवलं असं तिनंच स्पष्ट करत गरोदरपणाच्या चर्चा पूर्णपणे खोट्या असल्याचं म्हणत अनेकांच्याच तोंडाला कुलूप लावलं. 



मितालीची पॅरिसवारी... 


मिताली मयेकर आणि अभिनेता सिद्धार्थ चांदेकर यांनी 2021 मध्ये लग्नगाठ बांधली. अतिशय थाटामाटात त्यांचा विवाहसोहळा पार पाडला. त्या क्षणापासूनच या जोडीनं त्यांच्या नात्याचे विविध पैलू चाहत्यांच्या भेटीला आणले. हल्लीच सिद्धार्थ आणि मिताली पॅरिसलाही गेले होते. प्रवासादरम्यानचे अनेक सुरेख क्षण त्यांनी चाहत्यांच्या भेटीला आणले होते. अशी ही जोडी सध्या आपआपल्या करिअरवरच लक्ष केंद्रीत करताना दिसत आहे.