मुंबई : छोट्या पडद्यामुळे प्रकाशझोतात आलेली आणि 'हंपी' या चित्रपटातून झळकलेली अभिनेत्री प्राजक्ता माळी पुन्हा एकदा अडचणीत आली आहे. फॅशन डिझायनरला मारहाण केल्याचा आरोप करण्यात आल्याचा आरोप तिच्यावर करण्यात आला होता. जान्हवी मनचंदा हिला मारहाण केल्याप्रकरणीच्या सुनावणीसाठी न्यायालयात उपस्थित न राहिल्यामुळे तिच्याविरोधात जामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वारंवार नोटीस बजावूनदेखील कोर्टात हजर न राहिल्याने एक हजार रुपयांचा दंड आकारत, ठाणे कोर्टाने हे जामीनपात्र अटक वॉरंट जारी केलं आहे. फॅशन डिझाइनर जान्हवी मनचंदाने ठाणे कोर्टात प्राजक्ताविरोधात मारहाण केल्याचा आरोप करत याचिका दाखल केली होती त्याच प्रकरणाला आता एक नवं वळण मिळालं आहे. दरम्यान, हे सारंकाही प्रसिद्धीझोतात येण्यासाठी केलं जात असल्याची प्रतिक्रिया प्राजक्ताने केलं होतं. 


काय होतं हे प्रकरण? 



काही महिन्यांपूर्वी फॅशन डिझायनर जान्हवी मनचंदा हिने प्राजक्ताविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली होती. आपल्याला मारहाण केल्याचं तिने या तक्रारीत म्हटलं होतं. पण आपण मारहाण केली नसल्याच्या मतावर प्राजक्ता ठाम होती. या साऱ्या प्रकरणाला आता प्राजक्ताच्या नावे जामीनपात्र वॉरंट निघाल्यानंतर काय वळ मिळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.