Prajakta Mali New Hairstyle : मराठी मनोरंजन विश्वातील अतिशय प्रतिष्ठित पुरस्कार सोहळ्यांपैकी एक म्हणजे फिल्मफेअर पुरस्कार. अतिशय मानाचा मानला जाणारा हा मराठी फिल्मफेअर पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला. यंदा या कार्यक्रमाला मराठीसह हिंदी कलाकारांनी हजेरी लावली. या पुरस्कार सोहळ्यात अनेक कलाकारांनी आणि चित्रपटांनी प्रेक्षकांची मन जिंकून पुरस्कार पटकावले आहेत. या कार्यक्रमात मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या लूकने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. तिचा लूक पाहून अभिनेत्री क्रांती रेडकरने कमेंट केली आहे. 


प्राजक्ता माळीने केली सुंदर हेअरस्टाईल


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीत प्राजक्ता माळीचे नाव कायमच आघाडीवर असते. प्राजक्ता माळी ही सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. ती नेहमी तिच्या आयुष्यातील विविध गोष्टींची अपडेट चाहत्यांना देत असते. आता प्राजक्ताने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत ती व्हॅनिटी व्हॅनमध्ये मेकअप करताना दिसत आहे. यानंतर ती आरशात स्वत:चा लूक पाहते आणि नंतर व्हॅनिटी व्हॅनमधून खाली उतरते. 


यावेळी प्राजक्ताने रंगेबेरंगी मेटालिक सूट परिधान केल्याचे पाहायला मिळत आहे. त्यासोबतच तिने या लूकला साजेशी ज्वेलरी आणि मेकअपही केल्याचे पाहायला मिळत आहे. यावेळी प्राजक्ताने सुंदर हेअरस्टाईल केली होती. यात ती फोटोशूटसाठी पोझ देताना दिसत आहे. 



क्रांती रेडकर, अमृता खानविलकरची कमेंट


या व्हिडीओला कॅप्शन देताना प्राजक्ताने 'फिल्मफेअरची रात्र' असे म्हटले आहे. त्यासोबतच तिने 'रेड कार्पेट', 'फोटोशूट' असे हॅशटॅगही दिले आहेत. तिच्या या व्हिडीओवर अभिनेत्री क्रांती रेडकरने कमेंट केली आहे. "तू तुझ्या केसांची स्टाईल अशाच प्रकारे ठेवत जा, तुला खूप सुंदर दिसते", असे क्रांतीने म्हटले आहे. तर अमृता खानविलकरने "प्राजू तुझे केस खरंच भारी दिसतात", असे म्हटले आहे. 


'बाईपण भारी देवा' चित्रपटाने फटकावला सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार


दरम्यान यंदाच्या 8 व्या मराठी फिल्मफेअर पुरस्कार 2024 या सोहळ्यात 'आत्मपॅम्फ्लेट', 'बाईपण भारी देवा' या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपट या पुरस्काराने गौरवण्यात आले. तर सर्वोत्कृष्ट अभिनेता (समीक्षक) म्हणून 'महाराष्ट्र शाहीर' या चित्रपटासाठी अंकुश चौधरीला गौरवण्यात आले. तर सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (समीक्षक) हा पुरस्कार रोहिणी हट्टंगडी ('बाईपण भारी देवा') यांना मिळाला.